स्वाइनचे ७ बळी
By admin | Published: September 12, 2015 01:58 AM2015-09-12T01:58:56+5:302015-09-12T01:58:56+5:30
राज्यात मागील काही दिवसांपासून स्वाइन फ्लूमुळे बळी पडणाऱ्या रुग्णांमध्ये पुन्हा वाढ झाली असून, ही संख्या शुक्रवारी सातवर गेली आहे. यामध्ये सिंधुदुर्गातील १, ठाण्यातील २,
पुणे : राज्यात मागील काही दिवसांपासून स्वाइन फ्लूमुळे बळी पडणाऱ्या रुग्णांमध्ये पुन्हा वाढ झाली असून, ही संख्या शुक्रवारी सातवर गेली आहे. यामध्ये सिंधुदुर्गातील १, ठाण्यातील २, मुंबईतील १, सांगलीतील १, तर गुजरातमधील एकाचा समावेश आहे.
शुक्रवारच्या स्वाइन फ्लूच्या मृत्यूंमुळे राज्यातील स्वाइन फ्लूमुळे मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या ६७४ इतकी झाली आहे. बदलत्या हवामानामुळे या आजाराच्या विषाणूंना पोषक वातावरण निर्माण होत असल्याने या संख्येत वाढ होत असल्याचे चित्र आहे.
शुक्रवारी दिवसभरात राज्यातील ९७३६ जणांची तपासणी करण्यात आली असून, त्यातील ४९५ जणांना टॅमीफ्लूचे औषध देण्यात आले
आहे. यातील ५६ जणांना स्वाइन
फ्लू झाल्याचे निदान झाले आहे. तसेच राज्यभरात ३२ जण या आजाराने व्हेंटिलेटरवर आहेत. (प्रतिनिधी)