राज्यात ७ हजार किमीचे अतिरिक्त रस्ते बांधणार; मंत्रिमंडळ बैठकीत १० महत्वाचे निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Published: February 14, 2024 03:25 PM2024-02-14T15:25:32+5:302024-02-14T15:26:00+5:30

रस्ते बांधणी, वाळू दर निश्चिती, इंटर्नशिप विद्यार्थ्यांना विद्यावेतनात वाढ असे निर्णय घेण्यात आले आहेत. 

7 thousand km of additional roads will be built in the state CM Gram Sadak Yojana; 10 important decisions in the Eknath Shinde cabinet meeting | राज्यात ७ हजार किमीचे अतिरिक्त रस्ते बांधणार; मंत्रिमंडळ बैठकीत १० महत्वाचे निर्णय

राज्यात ७ हजार किमीचे अतिरिक्त रस्ते बांधणार; मंत्रिमंडळ बैठकीत १० महत्वाचे निर्णय

आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत दहा महत्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. यामध्ये रस्ते बांधणी, वाळू दर निश्चिती, इंटर्नशिप विद्यार्थ्यांना विद्यावेतनात वाढ असे निर्णय घेण्यात आले आहेत. 

राज्य मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णय पुढीलप्रमाणे...

1. मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेत अतिरिक्त ७ हजार किमी रस्ते व पुलाची कामे. ( ग्रामविकास विभाग) 

2. ऑनलाईन पद्धतीने वाळू, रेती पुरविण्यासाठी सर्वंकष सुधारित रेती धोरण. ना नफा ना तोटा तत्त्वावर वाळू विक्री दर निश्चित करणार ( महसूल विभाग) 

3. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील इंटर्नशिप विद्यार्थ्यांना विद्यावेतनात भरीव वाढ. आता मिळणार दरमहा १८ हजार ( वैद्यकीय शिक्षण विभाग)
4. राज्य शासकीय कर्मचाऱ्यांच्या आश्वासित प्रगती योजनेत सुधारणा.  ( वित्त विभाग)
5. उच्च तंत्रज्ञान वापरणाऱ्या अती विशाल उद्योगांना प्राधान्य क्षेत्राचा दर्जा. विशेष प्रोत्साहने देणार. राज्यातील कमी विकसित भागांना फायदा ( उद्योग विभाग) 

6. सायन कोळीवाडातील सिंधी निर्वासितांच्या २५ इमारतींचा पुनर्विकास करणार. म्हाडा करणार विकास. (गृहनिर्माण विभाग) 

7. अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती योजनेसाठी सुधारित मार्गदर्शक सूचना. ( सामाजिक न्याय विभाग) 

8. राज्यात सहा ठिकाणी नर्सिंग महाविद्यालय. ( वैद्यकीय शिक्षण विभाग) 

9. एकात्मिक औद्योगिक क्षेत्रात पायाभूत सुविधांना प्रोत्साहन देणार. मुद्रांक शुल्क माफीमध्ये लीजचा समावेश. (उद्योग विभाग)

10. भुदरगड तालुक्यात नवीन समाजकार्य महाविद्यालय. (सामाजिक न्याय विभाग)

Web Title: 7 thousand km of additional roads will be built in the state CM Gram Sadak Yojana; 10 important decisions in the Eknath Shinde cabinet meeting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.