तूरखरेदी घोटाळ्यात ७० जणांवर गुन्हा दाखल, संशयितांमध्ये ११ महिलांचा समावेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2017 02:02 AM2017-09-03T02:02:43+5:302017-09-03T02:02:54+5:30
जालना केंद्रावरील तूर खरेदी प्रकरणी चंदनझिरा पोलिसांत ४९ शेतकरी, १८ व्यापा-यांसह ७० जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या संशयितांमध्ये ११ महिलांचा समावेश आहे.
जालना : जालना केंद्रावरील तूर खरेदी प्रकरणी चंदनझिरा पोलिसांत ४९ शेतकरी, १८ व्यापा-यांसह ७० जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या संशयितांमध्ये ११ महिलांचा समावेश आहे.
जालना कृषी बाजार समिती आवारात असलेल्या नाफेडच्या तूर खरेदी केंद्रावर शेतकºयांच्या नावावर व्यापाºयांनीच तूर विक्री केल्याच्या तक्रारींची दखल घेत स्थानिक गुन्हे शाखेने या प्रकरणी तपास केला. कागदपत्रांची छाननी केल्यानंतर यात ८४०० शेतकºयांची नावे संशयास्पद असल्याचे समोर आले. हा तपास पूर्ण झाल्यानंतर जिल्हाधिकाºयांनी संबंधितांविरुद्ध गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले. त्यानुसार शुक्रवारी जालना कृषी उत्पन्न बाजार समितीतील केंद्रावर शेतकºयांच्या नावे तूर विक्री करणाºया १८ व्यापाºयांसह ४९ शेतकºयांवर चंदनिझरा पोलीस ठाण्यात कलम ४६७, ४६८, ४२०, ४०९, ३४ व जीवनावश्यक वस्तू कायद्यानुसार शुक्रवारी गुन्हा दाखल करण्यात आला. जिल्ह्यातील सातोना, परतूर, अंबड आणि तीर्थपुरी येथील नाफेडच्या हमीभाव तूर खरेदी केंद्रांवरील बोगस नावांवर केलेल्या तूर विक्रीचा तपास अहवाल आठ दिवसांत सादर होणार आहे़
- एप्रिल व मे महिन्यात या ४९ शेतकºयांनी बनावट कागदपत्रांच्या आधारे ९२ लाख, ५७ हजार ८५९ रुपये किमतीची तूर नाफेड केंद्रावर विकली. पैकी ८४ लाख नऊ हजार ८३३ रुपये ‘आरटीजीएस’द्वारे व्यापाºयांच्या खात्यावर वर्ग केले, असे साहाय्यक निबंधक विष्णू रोडगे यांनी दिलेल्या फिर्यादीत नमूद आहे.