मराठवाड्यात ७० शेतकऱ्यांची आत्महत्या
By admin | Published: January 29, 2016 01:58 AM2016-01-29T01:58:50+5:302016-01-29T01:58:50+5:30
मराठवाड्यात नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच ७० शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले असून, त्यापैकी एकाही कुटुंबाला अजून सरकारी मदत मिळालेली नाही. पंचनाम्यांच्या संचिका सरकारी दप्तरी पडून
औरंगाबाद : मराठवाड्यात नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच ७० शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले असून, त्यापैकी एकाही कुटुंबाला अजून सरकारी मदत मिळालेली नाही. पंचनाम्यांच्या संचिका सरकारी दप्तरी पडून आहेत. २२ जानेवारीपर्यंत ७० आत्महत्यांची नोंद विभागीय आयुक्तालय प्रशासनाकडे झाली आहे. सरत्या आठवड्यातील नोंदी अद्याप प्रशासनाकडे आलेल्या नाहीत.
शेतकऱ्यांनी कर्जबाजारीपणा व नापिकीला कंटाळून टोकाचे पाऊल उचलले आहे.
गतवर्षी ११२० शेतकऱ्यांच्या आत्महत्यांची नोंद झाली आहे.
कर्ज काढून पेरणीचा जुगार खेळणाऱ्या शेतकऱ्यांवर आस्मानी संकट येत
आहे. तर दुसरीकडे जे हाती
लागले त्या पिकांना भाव मिळत नसल्याने आत्महत्यांचे प्रमाण वाढू लागले आहे.
समुपदेशनाचे पथक कागदावरच
शेतकऱ्यांचे मनोबल वाढावे यासाठी मानसोपचार तज्ज्ञांचे पथक स्थापन करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. परंतु हे पथक अजून अस्तित्वात आलेले नाही. अध्यादेश निघून चार महिने झाले. या काळात ४०० शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या आहेत. (प्रतिनिधी)