इतर पक्षांतील ७० आमदार भाजपाच्या संपर्कात!, राणेंचा प्रवेश नवरात्रात; विरोधकांचे संख्याबळ कमी करण्याचा डाव
By अतुल कुलकर्णी | Published: September 12, 2017 05:22 AM2017-09-12T05:22:50+5:302017-09-12T05:23:19+5:30
काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेमधील तब्बल ७० आमदार भाजपाच्या संपर्कात असून कोणाला घ्यायचे आणि कोणाला नाही याचा निर्णय भाजपा पक्षश्रेष्ठी घेणार आहेत. तर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचा भाजपाप्रवेश नवरात्रात केला जाईल, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळालीे आहे.
मुंबई : काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेमधील तब्बल ७० आमदार भाजपाच्या संपर्कात असून कोणाला घ्यायचे आणि कोणाला नाही याचा निर्णय भाजपा पक्षश्रेष्ठी घेणार आहेत. तर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचा भाजपाप्रवेश नवरात्रात केला जाईल, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळालीे आहे.
काँग्रेस पक्षावर नाराज असलेले राणे सध्या भाजपाच्या वाटेवर आहेत. त्यामुळेच त्यांनी पक्षाचे राष्टÑीय उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या मराठवाडा दौºयाकडे पाठ फिरवली. राणेंना पक्षात घेण्यावरून भाजपात बराच खल झाला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राणे यांच्या भाजपात येण्याचे फायदे पटवून दिल्याने त्यांची वाट सुकर झाल्याचे समजते. राणेंच्या रूपाने मराठा समाजाचा एक मोठा नेता भाजपात येईल. शिवाय, कोकणात काँग्रेस व शिवसेनेला खिंडार पाडता येईल, असे राजकीय गणित मांडले जात आहे.
राणेंच्या सोबत नितेश राणे आणि कालिदास कोळंबकर भाजपात आले तर आपोआप काँगे्रेसचे संख्याबळ कमी होऊन विरोधी पक्षनेतेपद राष्टÑवादीकडे जाऊ शकते, असा डावही यामागे आहे.
राष्टÑवादीचा माजी मंत्री ‘रांगेत’?
पश्चिम महाराष्टÑातील राष्टÑवादीच्या एका दुय्यम नेत्याला भाजपात प्रवेश दिल्यानंतर त्याच जिल्ह्यातील मंत्री राहिलेल्या दुसºया बड्या नेत्याने थेट मुख्यमंत्र्यांना फोन करून, मी स्वत: तुमच्याकडे येण्यास तयार असताना तुम्ही त्याला कशाला घेत आहात, असा सवाल केल्याचे समजते.
विधानसभेत भाजपाचे संख्याबळ १२२ आहे. सरकारला पूर्ण बहुमतासाठी १४५ची गरज आहे. शिवसेना सतत विरोधी भूमिका घेत आहे. त्यामुळे पूर्ण बहुमत मिळेल अशी तजवीज करायची खेळी मुख्यमंत्री खेळत आहेत.
पितृपक्षानंतर जे बदल अपेक्षित आहेत, त्यात शिवसेनेमधील उद्योगमंत्री सुभाष देसाई, पर्यावरणमंत्री रामदास कदम, परिवहनमंत्री दिवाकर रावते यांच्यापैकी दोघांना बदलण्यात येईल, अशी चर्चा आहे. सरकारमध्ये भाजपाकडून होणाºया बदलावेळीच शिवसेनेनेही बदल करावेत यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंवर सेना आमदारांचा दबाव वाढत आहे.