यंदा सरासरीपेक्षा ७० टक्के अधिक पाऊस बरसणार
By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2020 02:10 AM2020-06-21T02:10:03+5:302020-06-21T06:38:13+5:30
महाराष्ट्रातही पाऊस सराससरी एवढा कोसळणार आहे.
मुंबई : येत्या काही दिवसांतच मान्सून संपूर्ण देश व्यापणार आहे. मान्सूनची स्वत:ची अशी एक क्षमता, वैशिष्ट्य असते; आणि याच जोरावर यंदा मान्सून बरसण्याची शक्यता वर्तविण्यात आली असून, मान्सून मिशन मॉड्युलनुसार पाऊस सरासरीपेक्षा ७० टक्के अधिक असेल. तर महाराष्ट्रातही पाऊस सराससरी एवढा कोसळणार आहे.
देश व्यापतानाच मान्सूनवर इतर कोणतीही हवामान प्रणाली प्रभाव टाकणार नाही. त्यामुळ केवळ आताच नाही तर पुढील काळातही मान्सूनवर कोणत्याही हवामान प्रमाणालीचा प्रभाव राहणार नाही. परिणामी मान्सूनवर अल निनोचे संकट नाही. त्यामुळे मान्सूनचा जोरदार वर्षाव होईल.
आजपर्यंतचा इतिहास पाहिल्यास अल निनो आणि ला निना हे सर्वसाधारणपणे एप्रिल ते जून या महिन्यादरम्यान विकसित होतात. त्यानंतरच्या काळात ते सक्रिय असतात. अल निनो, ला निनाची स्थिती नऊ ते बारा महिने असते. कधी कधी दोन वर्षेदेखील त्याचे अस्तित्त्व जाणवते. अल निनो दोन ते सात वर्षांनी पुन्हा सक्रिय होतो. सध्या प्रशांत महासागरातील हवामानुसार यावेळी अल निनोचा प्रभाव राहणार नाही.
>प्रशांत महासागरातील पूर्व आणि मध्य क्षेत्रात जिथे निनो असण्याचे संकेत मिळतात किंवा मिळत नाही ते क्षेत्र गेल्या आठ महिन्यांपासून उष्ण राहिले. त्यानंतर समुद्राच्या तापमानात घट झाली आणि आता अशी आशा आहे की, मान्सून काळात समुद्रावरील तापमान वाढणार नाही.
म्हणजेच अल निनोचा प्रभाव मान्सूनवर राहणार नाही. याचवेळी ला निनाची स्थिती निर्माण होईल. मात्र त्याचा प्रभाव तेवढा राहणार नाही. एका अर्थाने यावेळी मान्सून स्वत:च्या क्षमतेसह वैशिष्ट्यानुसार बरसणार आहे.
>महाराष्ट्रातही सराससरी
एवढा कोसळणार
मान्सूनसाठी हानीकारक असलेला अल निनो यंदा न्युट्रल आहे. हे आपल्यासाठी सुचिन्ह आहे.
ला निना आपल्या मान्सूनला अनुकूल ठरतो. मान्सूनच्या मध्यात ला निनो तयार होईल. हे सुद्धा आपल्यासाठी सुचिन्ह आहे.- हे सर्व घटक असे दर्शवित आहेत की एकंदर यंदाचा मान्सून देशासाठी सरासरीपेक्षा अधिक पाऊस घेऊन येणार आहे.
जून ते सप्टेंबरदरम्यानचा जो पाऊस असेल तो सरासरी एवढा असेल.
यंदा संपूर्ण देशाचा पाऊस त्याच्या सरासरीच्या १०० टक्के पडेल.
दक्षिण भारत, उत्तर पश्चिम भारतात पाऊस सरासरी पेक्षा जास्त असेल.
महाराष्ट्रातही पाऊस सराससरी एवढा कोसळणार आहे.