७0 बंधा-यांत भ्रष्टाचार!

By admin | Published: November 7, 2016 02:52 AM2016-11-07T02:52:08+5:302016-11-07T02:52:08+5:30

सिंचनाचा अकोला जिल्हय़ात बोजवारा;मागणी करूनही हस्तांतरण नाही.

70 tied-up corruption! | ७0 बंधा-यांत भ्रष्टाचार!

७0 बंधा-यांत भ्रष्टाचार!

Next

सदानंद सिरसाट
अकोला, दि. ६- एकेकाळी कोल्हापुरी बंधार्‍यातील कोट्यवधींच्या भ्रष्टाचाराने जिल्हा परिषदेचा लघुसिंचन विभाग पुरता रिकामा झाला. त्यातीलच ८४ कामे लघुपाटबंधारे (स्थानिक स्तर) या विभागाकडे असताना आतापर्यंत त्यातील केवळ १४ कामे जिल्हा परिषदेला हस्तांतरित करण्यात आली. ७0 कामांची सद्यस्थिती हस्तांतरणात अडचणीची असल्याने पाटबंधारे विभागाने सातत्याने टाळाटाळ चालविली आहे. त्यामुळे या कामात भ्रष्टाचार झाल्याची शक्यता वरिष्ठ अधिकार्‍यांनी वर्तविली आहे.
सिंचनासाठी कोल्हापुरी बंधारे चांगला पर्याय आहे. १00 हेक्टर सिंचन क्षमता असलेले तलाव, बंधारे जिल्हा परिषदेच्या अख्त्यारित येतात. त्यासाठी शासनाकडून निधीही दिला जातो. ती कामे करण्यासाठी जिल्हा परिषदेत लघुसिंचन विभाग ही स्वतंत्र यंत्रणा आहे; मात्र जिल्हा परिषदेकडे निधी आलेल्या अनेक कोल्हापुरी बंधार्‍यांची कामे लघुपाटबंधारे विभाग स्थानिक स्तर यांच्याकडे देण्यात आली. त्या कामांसाठी मिळालेला कोट्यवधींचा निधी या विभागाकडून खर्च केला जातो. गेल्या काही वर्षांत कोल्हापुरी बंधार्‍याच्या कामात प्रचंड भ्रष्टाचार झाल्याची अनेक प्रकरणे उघडकीस आली. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या लघुसिंचन विभागात काम करण्यासही कुणी उरले नव्हते.
जिल्हा परिषदेच्या ८४ बंधार्‍यांची कामे स्थानिक स्तरकडे देण्यात आली. त्यापैकी केवळ १४ कामे जिल्हा परिषदेला हस्तांतरित केली. उर्वरित कामे हस्तांतरित करा, असे जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुभाष पवार यांनी सातत्याने या विभागाला सांगितले आहे; मात्र त्यांनाही दाद दिली जात नसल्याचा प्रकार घडत आहे.





Web Title: 70 tied-up corruption!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.