बनावट सोने गहाण ठेवून ७० हजारांची फसवणूक
By admin | Published: February 16, 2015 03:33 AM2015-02-16T03:33:00+5:302015-02-16T03:33:00+5:30
चांदीमिश्रित सोने गहाण ठेवून योगेश पाटील याने आधी मण्णपुरम फायनान्स कंपनीकडून ९१ हजार ७०० चे कर्ज घेतले. त्यातील उर्वरित ६९ हजार ६०० चे कर्ज परतफेड
ठाणे : चांदीमिश्रित सोने गहाण ठेवून योगेश पाटील याने आधी मण्णपुरम फायनान्स कंपनीकडून ९१ हजार ७०० चे कर्ज घेतले. त्यातील उर्वरित ६९ हजार ६०० चे कर्ज परतफेड करण्यास नकार देऊन या कंपनीची फसवणूक केली. याप्रकरणी नौपाडा पोलीस ठाण्यात त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केल्याची माहिती पोलिसांनी दिली.
कर्जदार पाटील याने ८ आॅगस्ट २०१४ रोजी मण्णपुरम फायनान्स कंपनीच्या ठाण्यातील दादा पाटीलवाडी शाखेतून ४७.४०० ग्रॅम वजनाचे सोन्याचे ब्रेसलेट तारण ठेवले. त्यात चांदीमिश्रित धातू असल्याचे माहीत असूनही त्यांनी त्या बनावट सोन्यापोटी ९१ हजार ७०० चे कर्ज घेतले होते. त्यापैकी काही रक्कम भरून उर्वरित ६९ हजार ६०० ची परतफेड करण्यास मात्र नकार दिला. याप्रकरणी ‘मण्णपुरम’चे विभागीय प्रमुख अधिकारी सिमेश सोमण यांनी नौपाडा पोलीस ठाण्यात १४ फेब्रुवारी रोजी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. सहायक पोलीस निरीक्षक निर्मला पाटील याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत. (प्रतिनिधी)