कोकण विभागाला ७.०६ कोटी दुष्काळ निधी; १ हजार ५४५ कोटींचा निधी वर्ग
By ऑनलाइन लोकमत | Published: February 16, 2019 01:59 AM2019-02-16T01:59:58+5:302019-02-16T02:00:08+5:30
दुष्काळ जाहीर केलेल्या १५१ तालुक्यांतील शेतकऱ्यांना पीक नुकसानपोटीचा १,४५४ कोटी रुपयांचा दुसरा हप्ता राज्य सरकारने वितरित केला असल्याची माहिती मदत व पुनर्वसन विभागाचे सचिव किशोरराजे निंबाळकर यांनी दिली.
मुंबई : दुष्काळ जाहीर केलेल्या १५१ तालुक्यांतील शेतकऱ्यांना पीक नुकसानपोटीचा १,४५४ कोटी रुपयांचा दुसरा हप्ता राज्य सरकारने वितरित केला असल्याची माहिती मदत व पुनर्वसन विभागाचे सचिव किशोरराजे निंबाळकर यांनी दिली.
केंद्र सरकारच्या दुष्काळ संहितेप्रमाणे राज्यातील १५१ तालुक्यांत राज्याने दुष्काळ जाहीर केला आहे. या तालुक्यांतील शेतकºयांना पीक नुकसानीची मदत देण्यासाठी २ हजार ९०९ कोटी ५१ लाख ९ हजार रुपयांची मदत वितरित करण्यास मान्यता दिली होती. त्यापैकी मदतीचा पहिला हप्ता यापूर्वीच देण्यात आला होता. आता उर्वरित १ हजार ४५४ कोटी ७५ लाख ५४ हजार ६८० इतकी रक्कम विभागीय आयुक्तांकडे वर्ग करण्यात आली आहे. ही रक्कम तातडीने पात्र बाधित शेतकºयांच्या खात्यावर वितरित करण्याच्या सूचना देण्यात आल्याचे निंबाळकर म्हणाले.
कोकण विभागाला सुमारे ७.०६ कोटी, नाशिक विभागाला ४४६.४८ कोटी, पुणे विभागाला २०६.५९ कोटी, औरंगाबाद विभागास ५२५.२९ कोटी, अमरावती विभागास २७३.१८ कोटी आणि नागपूर विभागास ३२.१३ कोटी रुपये वितरित केले आहेत. ३१ मार्चपूर्वी सर्व पात्र शेतकºयांच्या बँक खात्यात पैसे जमा करण्याच्या सूचना संबंधित विभागीय आयुक्त व जिल्हाधिकाºयांना देण्यात आल्या.