७/११चे दोषी मुंबईबाहेर
By admin | Published: October 11, 2015 01:35 AM2015-10-11T01:35:07+5:302015-10-11T01:35:07+5:30
मुंबईत ११ जुलै २००६ रोजी पश्चिम रेल्वेच्या लोकलगाड्यांमध्ये बॉम्बस्फोट केल्याबद्दल गेल्या आठवड्यात दोषी ठरवलेल्या १२ आरोपींची नागपूर, अमरावती,
मुंबई : मुंबईत ११ जुलै २००६ रोजी पश्चिम रेल्वेच्या लोकलगाड्यांमध्ये बॉम्बस्फोट केल्याबद्दल गेल्या आठवड्यात दोषी ठरवलेल्या १२ आरोपींची नागपूर, अमरावती, कोल्हापूर आणि येरवडा येथील मध्यवर्ती कारागृहांमध्ये रवानगी करण्यात आली आहे.
विशेष न्यायालयात हा खटला सुरू असताना हे आरोपी कच्चे कैदी होते. त्यांची न्यायालयात ने-आण करणे सुलभ व्हावे म्हणून त्यांना मुंबई मध्यवर्ती कारागृहात ठेवण्यात आले होते. मात्र आता निकाल लागल्यानंतर तुरुंग नियमांनुसार सिद्धदोष कैदी म्हणून त्यांना तेथून हलविण्यात आले आहे. विविध ठिकाणच्या आमच्या प्रतिनिधींनी दिलेल्या माहितीनुसार या १२पैकी चौघांना नागपूर, दोघांना अमरावती, चौघांना येरवडा तर दोघांना कोल्हापूरच्या कळंबा मध्यवर्ती कारागृहांत रेल्वेने नेण्यात आले.