७१८ मद्यपी चालकांवर कारवाई
By admin | Published: May 17, 2016 03:27 AM2016-05-17T03:27:12+5:302016-05-17T03:27:12+5:30
मद्यप्राशन करून वाहने चालविल्यामुळे बहुतांशी रस्ते अपघात घडतात. त्यामुळे अशा प्रवृत्तींचा बीमोड करण्यासाठी वाहतूक विभागाने कंबर कसली आहे.
नवी मुंबई : मद्यप्राशन करून वाहने चालविल्यामुळे बहुतांशी रस्ते अपघात घडतात. त्यामुळे अशा प्रवृत्तींचा बीमोड करण्यासाठी वाहतूक विभागाने कंबर कसली आहे. वर्षभरात वाहतूक विभागाने तब्बल ७१८ मद्यपी वाहन चालकांवर कारवाई केली. कारवाईचा हा आकडा गतवर्षीच्या तुलनेत अधिक असल्याचे दिसून आले आहे.
महामार्गावर रात्रीच्या वेळी होणारे बहुतांशी अपघात दारू पिवून वाहने चालविल्यामुळेच घडल्याचे वारंवर स्पष्ट झाले आहे. या पार्श्वभूमीवर वाहतूक विभागाने अशा वाहनचालकांच्या विरोधात कारवाई मोहीम सुरू केली आहे. गेल्या वर्षी एप्रिल २0१५ पर्यंत नवी मुंबई वाहतूक विभागाने ५८४ मद्यपी वाहनधारकांवर कारवाई केली होते. तर यंदा एप्रिल २0१६ पर्यंत तब्बल ७१८ जणांवर कारवाई करण्यात आली आहे. (प्रतिनिधी)