आषाढीनिमित्त सोडणार ७२ विशेष रेल्वेगाड्या
By ऑनलाइन लोकमत | Published: July 11, 2018 04:07 AM2018-07-11T04:07:18+5:302018-07-11T04:07:35+5:30
पंढरपूर येथील आषाढी यात्रेनिमित्त मुंबई, नवी अमरावती, खामगाव, लातूर व मिरज-कुर्डूवाडी मार्गावर ७२ विशेष रेल्वेगाड्या सोडण्यात येणार असल्याची माहिती मध्य रेल्वेच्या वतीने देण्यात आली.
पुणे - पंढरपूर येथील आषाढी यात्रेनिमित्त मुंबई, नवी अमरावती, खामगाव, लातूर व मिरज-कुर्डूवाडी मार्गावर ७२ विशेष रेल्वेगाड्या सोडण्यात येणार असल्याची माहिती मध्य रेल्वेच्या वतीने देण्यात आली. त्यामुळे यात्रेनिमित्त पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांचा प्रवास सुखकर होणार आहे.
मध्य रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते मिरज या गाडीच्या दोन फेºया होतील. ही गाडी दि. २२ जुलैला मध्यरात्री १२.२० वाजता मुंबई स्थानकातून सुटून त्याच दिवशी दुपारी ४.०५ वाजता मिरज स्थानकात पोहोचेल. तर, दि. २३ जुलैला रात्री ८.५५ वाजता मिरज स्थानकातून परतीचा प्रवास सुरू होईल. या गाडीला दादर, ठाणे, कल्याण, लोणावळा, पुणे, दौंड, कुर्डूवाडी, पंढरपूर, सांगोला, धालगाव हे थांबे असतील.
पंढरपूर-कुर्डूवाडी या गाडीच्या १२ फेºया होणार आहेत. ही गाडी दि. २०, २१, २२, २७, २८, २९ जुलैला दुपारी १.३५ वाजता पंढरपूर स्थानकातून सोडण्यात येणार आहे. तर, त्याच दिवशी दुपारी ३.३० वाजता कुर्डूवाडी स्थानकातून पंढरपूरकडे प्रस्थान करेल.
मिरज व पंढरपूर मार्गावर दि. १९ ते २८ जुलैदरम्यान दररोज डेमू
सोडण्यात येईल. ही गाडी मिरज स्थानकातून सकाळी ५.३० वाजता, तर पंढरपूर स्थानकातून सकाळी ९.५० वाजता सुटेल. मिरज व कुर्डूवाडीदरम्यानही अनुक्रमे दुपारी २.४० व रात्री ८.३० वाजता डेमू गाडी सोडण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती मध्य रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली.
नवी अमरावती ते पंढरपूर चार फेºया
नवी अमरावती ते पंढरपूर अनारक्षित गाडीच्या चार फेºया होतील. ही गाडी दि. १७ व २० जुलै रोजी दुपारी २ वाजता नवी अमरावती स्थानकातून सुटून दुसºया दिवशी ११.१५ वाजता पंढरपूर येथे पोहचेल. तर पंढरपूर येथून दि. १८ व २४ जुलैला दु. ४ वाजता सुटेल. खामगाव ते पंढरपूर ही गाडी दि. १९ व २५ जुलैला सकाळी ११.१५ वाजता खामगाव स्थानकातून पंढरपूरकडे रवाना होईल. तर, पढरपूर स्थानकातून त्याच दिवशी सकाळी दुपारी ४ वाजता निघेल. लातूर ते पंढरपूर ही दि. २०, २३, २४, २५ व २७ जुलैला सकाळी ७.४५ वाजता पंढरपूरकडे प्रस्थान करेल, तर त्याच दिवशी दुपारी २ वाजता पंढरपूर स्थानकातून सुटेल.