येत्या दोन वर्षांत देणार ७२ हजार सरकारी नोकऱ्या, मुख्यमंत्र्यांची घोषणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2018 05:22 AM2018-03-29T05:22:48+5:302018-03-29T05:22:48+5:30

राज्य शासन मोठ्या प्रमाणात नोकरकपात करीत असल्याचा आरोप विरोधी पक्षांनी केला

72,000 government jobs will be announced in the next two years, Chief Minister announced | येत्या दोन वर्षांत देणार ७२ हजार सरकारी नोकऱ्या, मुख्यमंत्र्यांची घोषणा

येत्या दोन वर्षांत देणार ७२ हजार सरकारी नोकऱ्या, मुख्यमंत्र्यांची घोषणा

Next

मुंबई : राज्य शासन मोठ्या प्रमाणात नोकरकपात करीत असल्याचा आरोप विरोधी पक्षांनी केला असतानाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्य शासनाच्या विविध विभागांमधील ७२ हजार पदे येत्या दोन वर्षांत भरण्यात येतील, अशी घोषणा आज विधानसभेत केली.
राज्यातील विविध विभागांतील रिक्त पदांचा आढावा घेऊन मुख्यमंत्री म्हणाले की, निम्मी पदे पहिल्या टप्प्यात तर उर्वरित दुसºया टप्प्यात भरली जातील. कृषी विभागात २५००, पशुसंवर्धन १०४७, मत्स्यविकास ९०, ग्रामविकास ११ हजार, आरोग्य १० हजार ५६८, गृह ७१११, सार्वजनिक बांधकाम ८३३७, जलसंपदा ८२२७, जलसंधारण २४२३, नगरविकास १५०० अशी एकूण ३६ हजार पदे पहिल्या टप्प्यात भरण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी जाहीर
केले.
२३६ शहरांमध्ये कचºयाच्या विलगीकरणाचे काम सुरू आहे. १४३ शहरांमध्ये कंपोस्ट खताची निर्मिती करण्यात येत आहे. १५२ शहरांचे १८५६ कोटींचे घनकचरा प्रकल्प मंजूर करण्यात आले आहेत. २००६मध्ये सर्व प्रकारच्या डाळींच्या निर्यातीवर बंदी होती, असे मुख्यमंत्री म्हणाले.
नागपूरमधील झीरो माईलची रचना आकर्षक पद्धतीने करण्यात येणार असून, जगभरातील पर्यटकांना आकर्षित केले जाईल, असेही मुख्यमंत्र्यांनी या वेळी सांगितले.

नगरविकासासाठी तीन पट निधी उपलब्ध करून देण्यात आला असून, प्लॅस्टिक बंदी मागे घेता येणार नाही. परंतु या क्षेत्रातील विविध संघटनांसोबत तीन महिने चर्चा करून मार्ग काढला जाईल, असेही मुख्यमंत्र्यांनी या वेळी सांगितले. राज्यात अमृत प्रकल्पांतर्गत ४९०० कोटी रुपयांची कामे सुरू आहेत. शहरांमध्ये घनकचरा व्यवस्थापनासाठी केंद्र शासनाच्या पंचसूत्रीचा स्वीकार करण्यात आला आहे.

Web Title: 72,000 government jobs will be announced in the next two years, Chief Minister announced

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.