७३ गावांत ‘एक गाव एक गणपती’

By admin | Published: September 11, 2015 09:09 PM2015-09-11T21:09:51+5:302015-09-12T00:09:00+5:30

सातारा तालुका : पोलीस प्रशासनाकडून ग्रामस्थांचे कौतुक

73 villages in 'One village one' | ७३ गावांत ‘एक गाव एक गणपती’

७३ गावांत ‘एक गाव एक गणपती’

Next

सातारा : गट-तट निर्माण होऊन वादाला तोंड फुटते. यातूनच पुढे भांडण तंटा वाढत जातो, त्यामुळे गावातील ऐक्य अबाधित राहावे, यासाठी शासनाने ‘एक गाव एक गणपती’ ही संकल्पना पुढे आणली. या संकल्पनेला यंदा जिल्हाभरातून चांगला प्रतिसाद मिळत असून, केवळ सातारा तालुक्यामध्ये तब्बल ७३ गावांमध्ये ही संकल्पना राबविण्यात आल्याने प्रशासनाने या गावांची विशेष नोंद घेतली आहे.गावात ऐकी राहावी, यासाठी शासनस्तरावर अनेक प्रयत्न केले जातात. त्याचाच एक भाग म्हणून ‘एक गाव एक गणपती’ संकल्पना पुढे आली. ज्या गावांमध्ये ही संकल्पना राबविण्यात आली. त्या गावांमध्ये गणेशोत्सवामध्ये वादावादीचे प्रसंग घडलेच नाहीत, असे प्रशासनाच्या निदर्शनास आले आहे. त्यामुळे या संकल्पनेला शासनस्तरावरून गावकऱ्यांना प्रोत्साहन मिळू लागले. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा सातारा तालुक्याने ‘एक गाव एक गणपती’ योजनेत चांगला सहभाग घेतला आहे. शहर पोलीस ठाणे, सातारा तालुका आणि बोरगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील तब्बल ७३ गावांनी ‘एक गाव एक गणपती’ बसविला आहे. या गावांना दरवर्षी ‘गणराया अ‍ॅवॉर्ड’मध्ये शासनाकडून गौरविण्यात येते. (प्रतिनिधी)


या गावांचा समावेश...-‘एक गाव एक गणपती’मध्ये सावली, अंगापूर वंदन, निगडी, केसुर्डी, परळी, आकले, आसले, शेंद्रे, कुरूण, मस्करवाडी यांसह ७३ गावांचा समावेश आहे. गेल्यावर्षी सातारा तालुक्यामध्ये ५३ गावांनी सहभाग घेतला होता. मात्र, यंदा या योजनेत सहभाग घेण्यासाठी प्रशासनाने जनजागृती केल्याने ही संख्या ७३ वर पोहोचली.


पोलिसांचा ताण कमी!--दरवर्षी गणेशोत्सवामध्ये आपल्याला कुठे तरी वादावादी झाल्याचे ऐकायला किंवा पाहायला मिळतेच; मात्र ज्या गावांमध्ये ‘एक गाव एक गणपती’ ही संकल्पना राबविण्यात आली. त्या गावांमध्ये वादावादीचे प्रकारच घडले नाहीत. त्यामुळे या गावांमध्ये पोलिसांना कसल्याही प्रकारचा बंदोबस्त अथवा मिरवणुकीमध्ये जादा कुमक पाठविण्याची कधीच गरज पडली नाही.गावकऱ्यांचा होतोय खर्च कमी गणेशोत्सवामध्ये वर्गणी देण्यावरूनही मोठे वादंग निर्माण होत असते; परंतु ‘एक गाव एक गणपती’ योजना ज्या गावांनी राबविली. त्या गावकऱ्यांनी गणेशोत्सवामध्ये आमचा खर्च कमी झाला असल्याचे गणेश मंडळांच्या बैठकीत कबुल केले होते. इतर गावांनीही या गावांचा आदर्श घेऊन या संकल्पनेची मुहूर्तमेढ भक्कम करावी.

Web Title: 73 villages in 'One village one'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.