महापालिका निवडणुकीसाठी मुंबईत 7304 मतदान केंद्र
By admin | Published: February 18, 2017 05:14 PM2017-02-18T17:14:58+5:302017-02-18T17:14:58+5:30
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी 1582 ठिकाणी 7304 मतदान केंद्र उभारण्यात येतील.
Next
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 18 - मुंबई महापालिका निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाची पूर्ण तयारी झाली आहे. मुंबई महापालिका निवडणुकीसाठी 1582 ठिकाणी 7304 मतदान केंद्र उभारण्यात येतील. प्रभाग क्रमाक 164 मध्ये 31 उमेदवार आहे तेव्हा येथे तीन इव्हिएम मशीन असणार आहेत. 37 ठिकाणी 15 पेक्षा जास्त उमेदवार असल्याने दोन ईव्हीएम मशीन असणार आहेत.
यंदाच्या निवडणुकीत एकूण 2275 उमेदवार आपले नशीब आजमावत आहेत. मुंबईत 17 ठिकाणी अतिसवेदशील केंद्र उभारण्यात आले आहे अशी माहिती अतिरिक्त आयुक्त संजय देशमुख यांनी दिली. आता पर्यंत पेडन्यूजच्या तीन तक्रारी आल्या असून, चौकशी सुरु आहे.
21 फेब्रुवारी रोजी सकाळी 7.30 पासून संध्याकाळी 5.30 पर्यंत मतदानाची वेळ आहे. अपंग , जेष्ठ नागरिक व्यक्तिना महापालिकेच्या आठ ठिकाणी डोलीची सेवा असणार आहे
मतदारांची संख्या :
एकूण : 91 लाख 80 हजार 491 मतदार
पुरुष : 50 लाख 30 हजार 361
महिला : 41 लाख 49 हहजार 749
तृतीयपंथीय : 381