कर्जमाफीच्या ८० दिवसांत ७४ शेतकरी आत्महत्या, यंदा १९७ शेतक-यांनी कवटाळले मृत्यूला

By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2017 06:56 PM2017-09-25T18:56:58+5:302017-09-25T18:58:45+5:30

74 farmer suicides in 80 days of debt waiver, this year, 197 farmers died due to poison | कर्जमाफीच्या ८० दिवसांत ७४ शेतकरी आत्महत्या, यंदा १९७ शेतक-यांनी कवटाळले मृत्यूला

कर्जमाफीच्या ८० दिवसांत ७४ शेतकरी आत्महत्या, यंदा १९७ शेतक-यांनी कवटाळले मृत्यूला

googlenewsNext

अमरावती, दि. २५ - सततचा दुष्काळ, कर्जबाजारीपणा, मुला-मुलींचे शिक्षण, विवाह आदींसाठी शेतक-यांचा सुरू असलेला संघर्ष अपुरा ठरत असून नैराश्य हावी होत असल्याचे चित्र आहे. यंदा जिल्ह्यात १९७ शेतक-यांनी मृत्युला कवटाळले आहे. शासनाने कर्जमाफी जाहीर केल्यानंतरच्या ८० दिवसांत ७४ शेतकरी आत्महत्या झाल्यात, हे उल्लेखनीय. 
यंदाच्या खरिपात पेरणीपासूनच पाऊस बेपत्ता आहे. त्यामुळे दुबार-तिबार पेरणीचे संकट शेतक-यांवर ओढवले. खरिपाच्या मूग, उडीद, सोयाबीन आदी पिकांच्या सरासरी उत्पादनात घट झाली आहे. शासनाने २८ जुनला  शेतक-यांचे दीड लाखांपर्यंतचे कर्ज माफ केले. मात्र, खरिपातील पिके पावसाअभावी माना टाकत असल्याने जगावे कसे, या विवंचनेत असलेल्या शेतक-यांनी आत्महत्येचा पर्याय स्वीकारला. थकबाकीदार असल्याने बँकांनी कर्ज नाकारले. त्यातच तातडीच्या १० हजारांच्या कर्जवाटपाची घोषणा शासनाने केली. तथापि  प्रत्यक्षात एकाही शेतक-याला कर्ज मिळाले नाही. त्यामुळे शेतकरी अडचणीत आला. 
सलग नापिकीमुळे शेतक-यांवरील कर्ज वाढत आहे. त्यामुळे शेतकरी आत्महत्या वाढल्या आहेत. राज्यात सर्वाधिक शेतकरी आत्महत्या अमरावती विभागात झाल्याची नोंद आहे. त्यातही यवतमाळ, अमरावती व वाशिम जिल्ह्यात शेतकरी आत्महत्यांमध्ये वाढ झाली आहे. यंदा जिल्ह्यात १९७ शेतक-यांनी मृत्यूचा फास आवळला. यामध्ये ७७ प्रकरणे पात्र, ४५ अपात्र तर ७६ प्रकरणे चौकशीसाठी प्रलंबित आहेत. शेतकरी आत्महत्यांची नोंद एक जानेवारी २००१ पासून ठेवण्यात येत असून तेव्हापासून आतापर्यंत तीन हजार २४९ शेतक-यांच्या आत्महत्यांची नोंद करण्यात आली. यापैकी एक हजार ३११ प्रकरणे पात्र, एक हजार ८६३ अपात्र तर अद्याप ७५ प्रकरणे चौकशीसाठी प्रलंबित आहेत.

 आता पोलीस अधिकारी देणार अहवाल
 शेतकरी आत्महत्या घडल्यानंतर पोलिसांकडे पंचनामा व शवविच्छेदन यापलिकडे फारसा तपास नसायचा. सर्व पडताळणी महसूल विभाग करायचा. त्यानंतर तालुक्यातून जिल्हास्तरावर अहवाल जात असे. जिल्हा समितीची बैठक दोन-तीन महिन्यानंतर व्हायची. एकंदर शेतकरी आत्महत्येनंतर त्या कुटूंबाला मदत मिळायला किमान चार महिने तरी लागायचे. मात्र, शासनाने निर्णय घेऊन  शेतकरी आत्महत्यांचा तपास पोलिसांकडे सोपविला असून  आठवड्याच्या आत अहवाल मागविण्यात येत असल्याने आता वारसांना लगेच मदत मिळणार आहे.

कर्जमाफीच्या काळात वाढल्या आत्महत्या
शासनाने जूनच्या शेवटी शेतक-यांची दीड लाखांपर्यंतची कर्जमाफी जाहीर केली. मात्र, याच कालावधीत यंदा शेतकरी आत्महत्यांमध्ये वाढ झाली आहे. जून महिन्यात २२, जुलै २५, आॅगस्ट २७ तर २२ सप्टेंबरपर्यंत २० शेतक-यांनी आत्महत्या केल्या आहेत. यंदा जानेवारीत १९, फेब्रुवारी २४, मार्च ३०, एप्रिल १४ व मे महिन्यात १७ शेतकºयांनी मृत्यूला कवटाळले. यामधील ७६ प्रकरणे चौकशीसाठी प्रलंबित आहेत.

Web Title: 74 farmer suicides in 80 days of debt waiver, this year, 197 farmers died due to poison

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.