दुस-याच्या खात्यातून ७४ हजाराची ऑनलाईन खरेदी
By admin | Published: March 9, 2016 02:09 AM2016-03-09T02:09:47+5:302016-03-09T02:09:47+5:30
रिसोड येथील महिलेची फसवणूक.
रिसोड (वाशिम): एका महिलेच्या भारतीय स्टेट बँकेच्या शाखेतील रिसोड येथील खात्यातून ७४, ४00 रूपयांची ऑनलाईन खरेदी करून फसवणूक केल्याचा प्रकार मंगळवारी उजेडात आाला.
कांचन मोहन लकरस यांच्या तक्रारीनुसार, ७ मार्च रोजी त्यांची मुलगी मैथिली हिला एका अनोळखी क्रमांकावरून फोन आला. त्या व्यक्तीने आपण जयपूर येथील भारतीय स्टेट बँकेच्या शाखेतून बोलत असल्याचे सांगून, बँक खात्यासंदर्भात माहिती विचारली. मुलीने संपूर्ण माहिती, तसेच एटीएम क्रमांक त्या व्यक्तीला दिला. त्याच नंबरवरून मैथिलीला आठ वेळा फोन करून माहिती विचारण्यात आली. त्यानंतर भारतीय स्टेट बँकेच्या रिसोड शाखेतील तिच्या आईच्या ३४६८६६२४८९0 क्रमांकाच्या खात्यातून ७ मार्च रोजी अज्ञात व्यक्तीने ऑनलाईन खरेदी करून ७४४00 रूपयांची फसवणूक केली. दरम्यान, बँकेतून पैसे काढतेवेळी खात्यात पैसे नसल्याचे खातेदारास समजल्यानंतर फसवणुकीचा प्रकार लक्षात आला. या प्रकरणी पोलिसांकडे तक्रार देण्यात आली असून, पुढील तपास सुरू आहे.