राज्यात ७५ ओमायक्रॉनबाधित; मुंबईतील रुग्णसंख्या ४०० पार
By ऑनलाइन लोकमत | Published: January 5, 2022 08:07 AM2022-01-05T08:07:29+5:302022-01-05T08:07:36+5:30
राज्यात आतापर्यंत एकूण ६५३ ओमायक्रॉन विषाणू बाधित रुग्णांचे निदान झाले आहे. यापैकी २५९ रुग्णांना त्यांची आरटीपीसीआर चाचणी निगेटिव्ह आल्यानंतर रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : राज्यात मंगळवारी ७५ ओमायक्रॉन बाधित रुग्ण सापडले आहेत. हे सर्व रुग्ण राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेने रिपोर्ट केले आहेत. राज्यात आतापर्यंत एकूण ६५३ ओमायक्रॉन विषाणू बाधित रुग्णांचे निदान झाले आहे. यापैकी २५९ रुग्णांना त्यांची आरटीपीसीआर चाचणी निगेटिव्ह आल्यानंतर रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. मुंबईत ओमायक्रॉन रुग्णांनी ४००चा आकडा पार केला आहे.
दिवसभरातील रुग्णांमध्ये मुंबई ४०, ठाणे मनपा ९, पुणे मनपा ८, पनवेल ५, नागपूर आणि कोल्हापूर प्रत्येकी ३, पिंपरी चिंचवड २, भिवंडी निजामपूर मनपा, उल्हासनगर, सातारा, अमरावती आणि नवी मुंबई प्रत्येकी १ इत्यादी रुग्णांचा समावेश आहे.
९१ नमुन्यांचा अहवाल अद्याप प्रलंबित
राज्यात १ नोव्हेंबरपासून आलेल्या आंतरराष्ट्रीय प्रवाशांचेदेखील क्षेत्रीय पातळीवर सर्वेक्षण सुरु आहे. विमानतळ आणि क्षेत्रीय सर्वेक्षणातून आतापर्यंत २,३९७ प्रयोगशाळा नमुने जनुकीय तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. यापैकी ९१ नमुन्यांचा अहवाल अद्याप प्रलंबित आहे.
आरटीपीसीआर केलेले प्रवासी
अतिजोखमीचे देश ३३,४०२
इतर देश २१,९३०
एकूण ५५,३३२
जिल्हा/मनपा आढळलेले एकूण रुग्ण
मुंबई ४०८*
पुणे मनपा ७१
पिंपरी चिंचवड ३८
पुणे ग्रामीण २६
ठाणे मनपा २२
पनवेल १६
नागपूर १३
नवी मुंबई १०
सातारा ८
कल्याण-डोंबिवली ७
उस्मानाबाद आणि कोल्हापूर ५
वसई-विरार ४
नांदेड आणि भिवंडी निजामपूर मनपा ३
औरंगाबाद, बुलडाणा, मीरा भाईंदर आणि सांगली २
लातूर, अहमदनगर, अकोला,
रायगड, उल्हासनगर अमरावती १
एकूण ६५३
nयातील २६ रुग्ण हे इतर राज्यातील, तर प्रत्येकी १ रुग्ण पालघर, जळगाव, नवी मुंबई, नाशिक, रायगड आणि औरंगाबाद येथील आहे. ७ रुग्ण ठाणे आणि ४ रुग्ण कोल्हापूर जिल्ह्यातील आहेत. ९ रुग्ण विदेशी नागरिक आहेत. मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरील सर्वेक्षणात हे रुग्ण आढळले आहेत.
तपासण्यांची आकडेवारी
१ डिसेंबरपासून राज्यातील मुंबई, पुणे आणि नागपूर आंतरराष्ट्रीय विमानतळावर मंगळवारी सकाळपर्यंत करण्यात आलेल्या तपासणीचा तपशील : एकूण आलेले प्रवासी
अतिजोखमीचे देश ३३,४०२
इतर देश १,९६,०२७
एकूण २२,४२९