लोकमतच्या जलमित्र मोहिमेत ७५० हॉटेल चालकांचा सहभाग
By admin | Published: May 10, 2016 12:02 AM2016-05-10T00:02:59+5:302016-05-10T00:02:59+5:30
जलसाक्षरता मोहिमेंतर्गत लोकमतने घेतलेल्या जलमित्र अभियानास महाराष्ट्रातून जोरदार प्रतिसाद मिळत असून
ऑनलाइन लोकमत
सोलापूर, दि. 10- राज्यभर निर्माण झालेल्या पाणीटंचाईचा सामना करण्यासाठी जलसाक्षरता मोहिमेंतर्गत लोकमतने घेतलेल्या जलमित्र अभियानास महाराष्ट्रातून जोरदार प्रतिसाद मिळत असून, रविवारपर्यंत ७५० पेक्षा अधिक रेस्टॉरंट आणि हॉटेल्सनी या अभियानात सहभाग नोंदविला आहे.
गेल्या चार वर्षांपासून अल्प प्रमाणात पडलेल्या पावसामुळे महाराष्ट्रात सर्वत्र तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. अशा स्थितीत पाण्याची बचत करणे गरजेचे झाले आहे. याविषयीची जनजागृती नागरिकांमध्ये व्हावी, या हेतूने ह्यलोकमतह्णने जलसाक्षरता अभियान राबविण्यास सुरुवात केली आहे. सहा आठवडे चालणाऱ्या या उपक्रमामध्ये हॉटेल, रेस्टॉरंट, कॅन्टीन, खानावळ, हॉस्पिटल, सोसायट्या, उत्पादन करणाऱ्या कंपन्या, आयटी कंपन्या, मल्टिप्लेक्सेस, मॉल्स अशा विविध ठिकाणी ही मोहीम राबविण्यात येणार आहे.
या मोहिमेअंतर्गत नागपूर, पुणे, नाशिक, औरंगाबाद, सोलापूर, कोल्हापूर, जळगाव, सातारा या ठिकाणी ह्यलोकमतह्णचे संपादकीय मंडळ आणि व्यवस्थापनाने हॉटेल असोसिएशनची बैठक घेऊन या अभियानाविषयीची माहिती दिल्यानंतर यातील बहुतांश जणांनी या मोहिमेत आपला सहभाग नोंदविला आहे.