नक्षल्यांनी जाळले ७६ ट्रक!

By admin | Published: December 24, 2016 04:33 AM2016-12-24T04:33:32+5:302016-12-24T04:33:32+5:30

एटापल्ली तालुका मुख्यालयापासून १८ किमी अंतरावर असलेल्या सुरजागड पहाडी परिसरात शुक्रवारी दुपारी नक्षलवाद्यांनी ७६ ट्रक,

76 trucks burned by Maoists | नक्षल्यांनी जाळले ७६ ट्रक!

नक्षल्यांनी जाळले ७६ ट्रक!

Next

रवी रामगुंडेवार/प्रतिक मुधोळकर / एटापल्ली (गडचिरोली)
एटापल्ली तालुका मुख्यालयापासून १८ किमी अंतरावर असलेल्या सुरजागड पहाडी परिसरात शुक्रवारी दुपारी नक्षलवाद्यांनी ७६ ट्रक, तीन पोकलँड व एक दुचाकी जाळल्याची घटना घडली. तसेच ट्रकचालक व मजुरांना नक्षलवाद्यांनी मारहाणही केली आहे.
मागील सहा ते आठ महिन्यांपासून सुरजागड लोहपहाडीवरून दररोज शेकडो ट्रक, लोहखनिजाच्या कच्च्या मालाची वाहतूक करीत आहेत. हा कच्चा माल लॉयड्स मेटल कंपनी घुग्गुस जिल्हा चंद्रपूर येथे नेण्यात येत होता. शुक्रवारी सकाळी ११.३०च्या सुमारास सशस्त्र नक्षलवादी सुरजागड येथे आले व त्यांनी उभ्या असलेल्या ट्रकचे डिझेल टँक फोडून ट्रक पेटवून दिले. जवळजवळ चार किमी परिसरात ७६ ट्रक, तीन पोकलँड मशीन व एक दुचाकी नक्षलवाद्यांनी जाळली.
ट्रकचे टायर फुटण्याचा मोठा आवाज व धूराचे लोळ नजीकच्या हेडरी गावापर्यंत दिसत होते. हा संपूर्ण परिसर धुराने व्यापलेला होता. पेटविलेल्या पहिल्या ट्रकपासून जवळपास तीन किमी अंतरावर नक्षलवाद्यांनी मोठे झाड कापून आडवे टाकले होते.
सुरजागड पहाडीवर ३ जानेवारीपासून ठाकूरदेव दसरा महोत्सव सुरू होणार आहे. अगदी त्याच्या सुरूवातीलाच नक्षलवाद्यांनी हे अग्निकांड घडवून आणले. गडचिरोली जिल्ह्याच्या इतिहासात आतापर्यंतची एवढे वाहन जळाल्याची ही सर्वात मोठी घटना आहे. या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्येही दहशत पसरली आहे.

Web Title: 76 trucks burned by Maoists

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.