बियाण्यांचे ७६६ नमुने अपात्र

By admin | Published: June 27, 2016 10:43 PM2016-06-27T22:43:28+5:302016-06-27T22:43:28+5:30

कृषी उत्पादन वाढीमध्ये बियाण्यांची सर्वात महत्त्वाची भूमिका आहे. त्यामुळे बियाणे गुणवत्तापूर्वक असणे आवश्यक असते. पेरणीनंतर बियाण्यांची उगवण व्यवस्थित झाली नाही तर शेतकऱ्याला

766 samples of seeds ineligible | बियाण्यांचे ७६६ नमुने अपात्र

बियाण्यांचे ७६६ नमुने अपात्र

Next

बीज परीक्षण प्रयोगशाळेचा रिपोर्ट : शेतकऱ्यांना बोगस बियाण्यांपासून सावध राहण्याचे आवाहन

नागपूर : कृषी उत्पादन वाढीमध्ये बियाण्यांची सर्वात महत्त्वाची भूमिका आहे. त्यामुळे बियाणे गुणवत्तापूर्वक असणे आवश्यक असते. पेरणीनंतर बियाण्यांची उगवण व्यवस्थित झाली नाही तर शेतकऱ्याला फार मोठे नुकसान होते. त्यामुळे बियाणे उत्पादक व पुरवठादार यांना बियाणे कायदा-१९६६ नुसार गुणवत्तापूर्वक बियाणे पुरवठा करणे बंधनकारक ठरते. अशा बियाणे उत्पादकांना बीज परीक्षण प्रयोगशाळेत आपल्या बियाण्यांची तपासणी करून घ्यावी लागते. यासाठी विदर्भात केवळ नागपुरात बीज परीक्षण प्रयोगशाळा असून, या अंतर्गत ११ जिल्ह्यांचा समावेश आहे. येथे तीन प्रकारच्या बियाणे नमुन्यांची तपासणी केल्या जाते. त्यानुसार या प्रयोगशाळेत मागील वर्षभरात एकूण १८ हजार १३८ बियाणे नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून, त्यापैकी ७६६ नमुने अपात्र ठरले आहेत. यापैकी
६,२७८ नमुने कृषी विभागातील गुणवत्ता नियंत्रण निरीक्षकांनी गोळा करून त्यापैकी तब्बल १०७ नमुने अपात्र ठरले आहेत.
अनेकदा या बीज परीक्षणाची गरज काय? असा शेतकरी प्रश्न उपस्थित करतात. मात्र जाणकारांच्या मते, जोपर्यंत बियाण्याची उगवण क्षमता माहीत होत नाही, तोपर्यंत प्रति एकर किती बियाणे पेरावे याचा अंदाज लावता येत नाही. शिवाय या तपासणीतून विक्रेते आणि शेतकरी यांना बियाण्यांची उगवण क्षमता, भौतिक शुद्घता, कीडग्रस्त प्रमाण आणि ओडीव्ही याचीही अचूक माहिती मिळते. त्यामुळे प्रत्येक बियाण्याची प्रयोगशाळेतून तपासणी करून घेणे अनिवार्य ठरते. मागील वर्षी प्रयोगशाळेत तपासणी केलेल्या एकूण बियाण्यांपैकी ४.२२ टक्के बियाणे अपात्र ठरले होते. या उपरोक्त ते बियाणे छुप्या मार्गाने बाजारातून शेतकऱ्यांना विक्री केले जाऊ शकते, अशी बीज परीक्षण अधिकाऱ्यांनी शंका उपस्थित केली आहे, तरी शेतकऱ्यांनी अशा बियाण्यांपासून सावध राहिले पाहिजे.
उपलब्ध आकडेवारीनुसार मागील १ एप्रिल २०१६ ते १५ मे २०१६ दरम्यान एकूण १०९ नमुने तपासण्यात आले आहेत. मात्र आश्चर्याची बाब म्हणजे, यापैकी एकही नमुना अपात्र ठरलेला नाही.

Web Title: 766 samples of seeds ineligible

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.