समुद्र सुरक्षेसाठी ७८ लाखांचे साहित्य

By Admin | Published: September 21, 2016 03:20 AM2016-09-21T03:20:00+5:302016-09-21T03:20:00+5:30

पर्यटकांच्या सुरक्षेसाठी रायगड जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या माध्यमातून महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे.

78 lakhs literature for sea safety | समुद्र सुरक्षेसाठी ७८ लाखांचे साहित्य

समुद्र सुरक्षेसाठी ७८ लाखांचे साहित्य

googlenewsNext


अलिबाग : रायगड जिल्ह्यातील समुद्र किनाऱ्यांवर पर्यटनासाठी येणाऱ्या पर्यटकांच्या सुरक्षेसाठी रायगड जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या माध्यमातून महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. ७८ लाख रुपये किमतीचे विविध ११ प्रकारची सुरक्षा साहित्य जिल्ह्यातील २४ किनाऱ्यांवरील सुरक्षा रक्षकांना मंगळवारी जिल्हाधिकारी शीतल तेली-उगले यांच्या हस्ते वाटप करण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात हा कार्यक्रम पार पडला.
या वेळी जिल्हाधिकारी शीतल तेली-उगले म्हणाल्या की, जिल्ह्यात येणाऱ्या पर्यटकांच्या सुरक्षेसंदर्भात सर्व यंत्रणांनी तसेच सागरी किनाऱ्यावर नेमलेल्या सुरक्षा रक्षकांनी जबाबदारीने काम करावे. आपण जशी घराची स्वच्छता व देखभाल आपले घर आहे म्हणून करतो त्याचप्रकारे आपल्या भागातील सागरी किनारा, आपले शहर, आपले गाव, आपला जिल्हा हे आपले घर आहे असे समजूनच त्याकडे लक्ष द्यावे, स्वच्छता राखावी. पर्यटकाला या ठिकाणी वारंवार यावे असे वाटावे, त्यामुळे पर्यटकांत वाढ होईल. पर्यायाने येथील पर्यटन व्यवसाय चांगला वाढेल, याकडेही संबंधितांनी लक्ष द्यावे. आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणामार्फत पर्यटकांच्या सुरक्षा व्यवस्थेसाठी करावयाच्या उपायोजनेसंदर्भात जिल्हास्तरावर कार्यक्रम राबविण्यात आला असून यात प्राथम्याने जीवरक्षकांची नेमणूक, त्यांचे प्रशिक्षण पूर्ण करण्यात आले आहे. जिल्ह्यातील समुद्र किनारा बिचवर २५ जीवरक्षक नेमण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी किरण पाणबुडे, जिल्हा परिषद रायगड उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेश कुलकर्णी, तहसीलदार अलिबाग प्रकाश संकपाळ, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी सागर पाठक आदी मान्यवर उपस्थित होते. (विशेष प्रतिनिधी)
>आधुनिक साहित्य
प्राधिकरणामार्फत जीवरक्षकांना मेगा फोन, दुर्बिण, टॉर्च, दोरखंड, लाइफ जॅकेट, फायबर स्ट्रेचर, स्कुबा ड्रायविंग सेट, जीवरक्षक रिंग, सायरन, उलन ब्लँकेट, सर्च लाइट या साहित्याचे वाटप अलिबाग, मांडवा, आक्षी, नागाव, किहिम, रेवदंडा, कोर्ले, मुरु ड-एकदरा, मुरु ड-जंजिरा जलदुर्ग, काशिद, श्रीवर्धन, हरिहरेश्वर, दिवेआगर, सासवणे, आवास,थळ, वरसोली, रांजणपाडा डावली, मिळकतखार, कोप्रोली बोडणी, आदगाव,वेळास आगर,घारापुरी, नागाव, पिरवाडा आदि ठिकाणांच्या सुरक्षेसाठी करण्यात आले असल्याची माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी सागर पाठक यांनी या कार्यक्रमात दिली.
24 किनाऱ्यांवरील सुरक्षा रक्षकांकडे मंगळवारी रायगडच्या जिल्हाधिकारी शीतल तेली-उगले यांच्या हस्ते सुरक्षा साहित्याचे वाटप करण्यात आले. 11विविध प्रकारच्या साहित्यामध्ये जीवरक्षकांना मेगा फोन, दुर्बिण, टॉर्च, दोरखंड, लाइफ जॅकेट, फायबर स्ट्रेचर, स्कुबा ड्रायविंग सेट, जीवरक्षक रिंग, सायरन, उलन ब्लँकेट, सर्च लाइटचा समावेश आहे.

Web Title: 78 lakhs literature for sea safety

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.