७, ८ फेब्रुवारीला आकाशात ग्रहांची माळ

By admin | Published: January 29, 2016 07:39 PM2016-01-29T19:39:20+5:302016-01-29T19:39:20+5:30

येणाऱ्या ७-८ फेब्रुवारी पर्यंत आपल्याला आकाशात नुसत्या डोळ्यानी दिसणारे सर्व ग्रह म्हणजे बुध, शुक्र, मंगळ, गुरू आणि शनी हे एका वेळीच बघता येतील.

On 7th, 8th of February, the planets of the planet in the sky | ७, ८ फेब्रुवारीला आकाशात ग्रहांची माळ

७, ८ फेब्रुवारीला आकाशात ग्रहांची माळ

Next

ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. २९ -  येणाऱ्या ७-८ फेब्रुवारी पर्यंत आपल्याला आकाशात नुसत्या डोळ्यानी दिसणारे सर्व ग्रह म्हणजे बुध, शुक्र, मंगळ, गुरू आणि शनी हे एका वेळीच बघता येतील. बघण्याची वेळ  सूर्योदया पूर्वी साधारण तास भर आधी असेल. 

सूर्योदया पूर्वी तास भर आधी आपल्याला गुरू हा पश्चिम क्षितीजावर बराच वर दिसेल. आकाशाच्या या भागात हा सर्वात प्रखर खगोल असणार आहे. गुरू च्या खाली जो प्रखर तारा दिसेल तो म्हणजे मघा. तर पूर्व क्षितीजावर आपल्याला सर्वात वर  जवळ जवळ डोक्यावर मंगळ दिसेल. याला याच्या लाल रंगा मुळे सहज ओळखता येऊ शकेल. मंगळाच्या खाली मग क्रमशः शनी, शुक्र आणि बुध असतील.

शुक्र हा क्षितीजाच्या खूप जवळ आहे. हा ही आपल्याला सहज ओळखता येऊ शकेल कारण या भागातील हा सर्वात सर्वात प्रखर ग्रह आहे. शुक्र आणि मंगळ यांच्या बरोबर मधे तुम्हाला शनी दिसेल. तर शुक्राच्या खाली बुध आहे. जर तुम्ही मंगळ शनी आणि शुक्र यांना काल्पनिक रेशेने जोडलेत तर त्याच रेशेवर पण शुक्राच्या खाली बुध आहे.

या ग्रहांची ओळख पटण्या करता आपण चंद्राची मदत पण घेऊ शकतो. २ फेब्रु. ला सुमारे अर्धा प्रकाशित चंद्र मंगळाच्या खाली पण डाव्या बाजूला असेल. तर ४ ता. तो आपल्याला शनी च्या डाव्या बाजूला पण थोडा वर दिसेल. मग ६ ता. चंद्राची बारीक कोर आपल्याला शुक्राच्या वर दिसु शकेल तर त्याच्या खाली बुध असेल. अर्थात यांना बघण्या करता आकाश निरभ्र तर हवेच तसेच शुक्र आणि बुध हे ब-या पैकी क्षितीजा जवळ आहेत त्या मुळे यांना बघण्या साठी पूर्व दिशेस क्षितीजा पर्यंत आकाश दिसायाल हवे.

 

Web Title: On 7th, 8th of February, the planets of the planet in the sky

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.