दर्शनासाठी चाला 8 किलोमीटर!
By admin | Published: July 6, 2014 12:34 AM2014-07-06T00:34:17+5:302014-07-06T00:34:17+5:30
विठ्ठल अभियांत्रिकी कॉलेजपासून ते रांग, दर्शन पत्र शेड, पुन्हा रांग आणि ज्ञानेश्वर दर्शन मंडपाचे सात मजले आणि मंदिर असा प्रवास करावा लागणार आहे.
Next
जगन्नाथ हुक्केरी - पंढरपूर
विठ्ठलाचे पददर्शन घेण्यासाठी ऐन आषाढीत गोपाळपूर येथील विठ्ठल अभियांत्रिकी कॉलेजपासून ते रांग, दर्शन पत्र शेड, पुन्हा रांग आणि ज्ञानेश्वर दर्शन मंडपाचे सात मजले आणि मंदिर असा प्रवास करावा लागणार आहे. हे अंतर आठ ते दहा किलोमीटर इतके होणार असल्याने वारक:यांना दर्शनासाठी आठ किलोमीटर अंतर चालावे लागणार आहे. यासाठी मंदिर समितीने ऊन, वारा, थंडी, पाऊस यापासून बचाव होण्यासाठी सोय केली आहे.
आषाढी यात्रेतील दहा ते बारा लाख वारक:यांना गर्दीचा त्रस होऊ नये, यासाठी पंढरपुरात 3 जुलैपासूनच वाहतूक मार्गात बदल करून बॅरिगेटिंग करण्यात आले आहेत. स्थानिक रिक्षा, टांगा व अंतर्गत वाहतुकीसाठी
परवाना देण्यात आला असून, या वाहनांसाठी मार्ग आखून देण्यात आले आहेत. पार्किग सोय बाहेर करण्यात आल्याने कोणत्याही वाहनांना शहरात प्रवेश नाही.
चंद्रभागा, भीमा बसस्थानकाबरोबरच कराड व सांगोला रस्त्यांवरून येणा:या वाहनांसाठी बाहेर थांबण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. शहरात मोठय़ा वाहनांना प्रवेश बंद करून तसे जमिनीवर रोवलेले लोखंडी बॅरिगेटिंग करण्यात आल्याने मोठी वाहने शहरात प्रवेश करणार नाहीत. शहरातील वाहतूक मार्गात बदल 3 ते 11 जुलै या कालावधीत राहणार आहे.
अवजड वाहनांना बंदी
नियमित ट्रक व यात्रेसाठी सोडण्यात येणा:या बसना जुना दगडी पूल व तीन रस्ता मार्ग त्याचबरोबर अनवली फाटा ते गौतम विद्यालय हा मार्ग बसबरोबरच जड वाहनांना बंद ठेवण्यात येणार आहे. पौर्णिमेला होणा:या गोपाळकाला सोहळ्यानिमित्त सर्व प्रकारच्या वाहनांसाठी अनवली फाटा ते गोपाळपूर रोड हा मार्ग बंद ठेवण्यात येणार आहे.
वाहतूक पोलिसांचा फौजफाटा
शहरातील वाहतूक सुरळीत करण्यासाठी एक
उपविभागीय पोलीस अधिकारी, सात पोलीस निरीक्षक,
33 उपनिरीक्षक, 100 होमगार्ड, 316 पोलीस कर्मचारी
असा फौजफाटा वाहतुकीवर लक्ष ठेवण्यासाठी तैनात केल्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल पाटील
यांनी सांगितले.
च्अहमदनगरकडून येणारी वाहने टेंभुर्णी, मोहोळ, सोलापूरमार्गे अथवा टेंभुर्णी, अकलूज, महूद, सांगोला, मंगळवेढामार्गे विजापूरला जातील व येतील तसेच पुण्याहून येणारी वाहने महूद, सांगोला, मंगळवेढामार्गे जातील व येतील. कॉलेज क्रॉसरोड ते सरगम चौक, सहकार चौक ते सावरकर चौक तसेच सावरकर चौक ते नवीन कराडनाका या मार्गावर एकेरी वाहतूक राहणार आहे.