घरगुती ग्राहकाला ८ लाखांचे वीजबिल
By admin | Published: May 23, 2016 02:21 AM2016-05-23T02:21:46+5:302016-05-23T02:21:46+5:30
वाडा वीजवितरण कंपनीचा मनमानी कारभार सुरू असून या कारभाराचा फटका एका घरगुती ग्राहकाला बसला असून त्यांना कंपनीने ८ लाखांचे वीजिबल आकारल्याने ग्राहकाने तीव्र संताप व्यक्त केला
वाडा : दि. २२ वाडा वीजवितरण कंपनीचा मनमानी कारभार सुरू असून या कारभाराचा फटका एका घरगुती ग्राहकाला बसला असून त्यांना कंपनीने ८ लाखांचे वीजिबल आकारल्याने ग्राहकाने तीव्र संताप व्यक्त केला असून वीज बिलाची दुरूस्ती न केल्यास महावितरणच्या कार्यालयासमोर बेमुदत उपोषणाचा इशारा दिला आहे.
वाडा तालुक्यातील कुडूस येथील ग्राहक प्रकाश शेटे यांचा ग्राहक क्र मांक ०१०५२३०३९७१ असा असून त्यांच्याकडे घरगुती वापराचे कनेक्शन आहे. यापूर्वी येणारे बील हे सरासरी दोन ते तीन हजार रूपये येत असताना एप्रिल २०१६ चे बील ७ लाख ५३ हजार ९६० रूपये इतके आले. अवास्तव बिलाबाबत वाडा येथे चौकशी केली असता ते भरण्याचा सल्ला दिला. त्यानंतर प्रकाश शेटे यांनी कल्याण येथील ग्राहक ग्रीव्हन्स रिड्रेसल फोरम याच्याकडे तक्र ार केली. त्यांनी सर्व कागदपत्रे व परिस्थितीचा अभ्यास करून सदरचे बील रद्द ठरवून प्रत्यक्ष नव्याने मीटर रिडींग घेऊन योग्य बील आकारण्याचा आदेश दिला.
मात्र सदरच्या आदेशाला केराची टोपली दाखवून एप्रिल महिन्यातील बिलावर दंड व अन्य कर आकारून मे महिन्यातील बील ८ लाख १६ हजार ६१० रूपये दिले. यामुळे शेटे व त्यांच्या कुटुंबियांना धक्का बसला असून त्यांचे मानसिक संतुलन बिघडल्याने वैद्यकीय उपचार घ्यावे लागले असे निवेदनात नमूद केले आहे. (वार्ताहर)