पश्चिम रेल्वेमार्गावरील ८ जुन्या फे-यांना फटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2017 06:58 AM2017-12-26T06:58:49+5:302017-12-26T06:59:04+5:30
बई : आरामदायी प्रवासासाठी पश्चिम रेल्वेने वातानुकूलित लोकल धडाक्यात सुरू केली. मात्र ही वातानुकूलित लोकल सुरू झाल्याने रोज सर्वसाधारण लोकलच्या ८ फे-या रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
महेश चेमटे
मुंबई : आरामदायी प्रवासासाठी पश्चिम रेल्वेने वातानुकूलित लोकल धडाक्यात सुरू केली. मात्र ही वातानुकूलित लोकल सुरू झाल्याने रोज सर्वसाधारण लोकलच्या ८ फे-या रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. १ जानेवारीपासून या ८ फे-या रद्द झाल्यावर याचा फटका सर्वसामान्य प्रवाशांना बसणार आहे.
पश्चिम रेल्वेवर चर्चगेट-विरार स्थानकांदरम्यान सध्या सुरू असलेल्या लोकलच्या जागेवर एसी लोकल चालवण्यात येत आहे. १२ नॉन एसी लोकल फेºयांच्या जागी वातानुकूलित फेरीचे नियोजन आधीच्या वेळापत्रकानुसार करण्यात आले आहे. परिणामी १२ वातानुकूलित लोकलच्या फेºया सुरू झाल्यावर पश्चिम रेल्वेवरील एकूण फे-यांची संख्या ही १३५५ कामय राहणार आहे. यापैकी एसी लोकलच्या ८ फेºया या चर्चगेट-विरार (अप-डाऊन) मार्गावर आहेत. ३ फे-या या चर्चगेट-बोरीवली मार्गावर धावणार आहेत. महालक्ष्मी ते बोरीवली मार्गावर एक धिमी एसी लोकल धावणार आहे,’ अशी माहिती पश्चिम रेल्वेने दिली.
यानुसार सध्या धावत असलेल्या चर्चगेट-विरार स्थानकांदरम्यान पिक अव्हरमध्ये सकाळी ८.५४ला धावणारी लोकल ही एसी लोकल असेल. त्यामुळे एसीमधून प्रवास न करणाºया प्रवाशांना ९.०३ अथवा ८.३३ मिनिटांच्या लोकलवर अवलंबून राहावे लागेल. संध्याकाळच्या पिक अव्हरमध्ये परिस्थिती आणखी बिकट होण्याची चिन्हे आहेत. रात्री ७.४९ मिनिटांनी एसी लोकल धावेल. याआधीची म्हणजे ७.४० मिनिटांची लोकल ही ‘महिला विशेष’ आहे. परिणामी विरारपर्यंत प्रवास करू इच्छिणाºया प्रवाशांना ७.३३ मिनिटांची जलद लोकल अथवा ७.५६ मिनिटांच्या लोकलने प्रवास करावा लागणार आहे. विरार येथून चर्चगेटसाठी प्रवास करणाºया प्रवाशांना एसी लोकलच्या आधीच्या वा नंतरच्या फेºयांप्रमाणे आपले वेळापत्रक निश्चित करावे लागणार आहे. सर्वसामान्य प्रवाशांना एसी लोकलचा रोज प्रवास करणे शक्य होणार नाही. त्यामुळे एसी लोकलच्या आधी वा नंतरच्या जलद फेºयांवरील लोकलमध्ये गर्दी वाढणार आहे.
>एका लोकलमधून सुमारे ६ हजार प्रवासी प्रवास करतात. चर्चगेट-विरारच्या कमी करण्यात येणाºया लोकलच्या फेºयांमुळे जवळपास ४८ हजार प्रवाशांना फटका बसणार आहे. गाड्यांच्या फेºया वाढविण्याऐवजी सुरू असलेल्या फेºयांच्या जागी एसी लोकल फेरी चालवणे हे अयोग्य आहे.
- समीर झव्हेरी, रेल्वे माहिती अधिकार कार्यकर्ता
>मुंबईत ‘गारेगार’ लोकल सुरू
मुंबई : बोरीवली फलाट क्रमांक ९वर सोमवारी नाताळच्या मुहुर्तावर देशातील पहिली वातानुकूलित लोकल दाखल झाली. पश्चिम रेल्वेवर सकाळी साडेदहा वाजता या लोकलला हिरवा झेंडा दाखविण्यात आला. - सविस्तर वृत्त/२