मालवणच्या समुद्रात बुडून 8 जणांचा मृत्यू
By admin | Published: April 15, 2017 01:25 PM2017-04-15T13:25:04+5:302017-04-15T14:26:22+5:30
बेळगाव येथील मराठा मंडळ इंजिनिअरिंग कॉलेजच्या ४७ विद्यार्थ्यांसह दोन शिक्षकांचा सहलीसाठी आलेल्या ग्रुपवर काळाने घाला घातला आहे.
Next
ऑनलाइन लोकमत
मालवण, दि. 15 - बेळगाव येथील मराठा मंडळ इंजिनिअरिंग कॉलेजच्या ४७ विद्यार्थ्यांसह दोन शिक्षकांचा सहलीसाठी आलेल्या ग्रुपवर काळाने घाला घातला आहे. शनिवारी सकाळी मालवणपासून जवळच असलेल्या वायरी शिवाजी पुतळ्यानजीक तेली पाणंद येथील समुद्रात आंघोळीसाठी उतरलेल्या ८ जणांना जीव गमवावा लागला आहे. यात सहा पुरुष व दोन विद्यार्थिनींचा समावेश आहे.
एक विद्यार्थिनी गंभीर जखमी असून तिला अधिक उपचारासाठी ओरोस येथील जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे.
मालवणनजीकच्या वायरी येथील समुद्रात आंघोळीसाठी उतरलेल्या आठजणांना जलसमाधी मिळाली असून ते सर्व बेळगावचे रहिवासी आहेत.
पर्यटनासाठी बेळगाव येथील मराठा मंडळ इंजिनिअरिंग कॉलेजच्या विद्यार्थ्यांचा ग्रुप मालवणात आला होता. स्थानिक ग्रामस्थांनी विरोध करूनही या ग्रुपमधील काहीजणांनी समुद्रात उडी घेतली. यापैकी आठजणांचा जागीच मृत्यू झाला. तर एक विद्यार्थिनी गंभीर आहे. स्थानिकांनी स्कुबा डायव्हरच्या मदतीने समुद्रात बुडालेल्यांना बाहेर काढले.
मृतांची नावे
मुजमीन अनिकेत
किरण खांडेकर
आरती चव्हाण
अवधूत
नितीन मुत्नाडकर
करुणा बेर्डे
माया कोल्हे
प्रा. महेश
(सर्व राहणार बेळगाव )
अत्यवस्थ (सिरीयस)
संकेत गाडवी
अनिता हानली
आकांक्षा घाडगे