राज्यात अजूनही ८ टक्के प्रौढ नागरिक कोरोना लसीच्या पहिल्या डोसपासून वंचित!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 13, 2022 05:47 AM2022-06-13T05:47:01+5:302022-06-13T05:47:14+5:30

राज्यात वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर लसीकऱण मोहिमेला गती देण्यासाठी विविध पातळ्यांवर प्रयत्न सुरू आहेत.

8 percent adults in state still deprived of first dose of corona vaccine | राज्यात अजूनही ८ टक्के प्रौढ नागरिक कोरोना लसीच्या पहिल्या डोसपासून वंचित!

राज्यात अजूनही ८ टक्के प्रौढ नागरिक कोरोना लसीच्या पहिल्या डोसपासून वंचित!

Next

मुंबई :

राज्यात वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर लसीकऱण मोहिमेला गती देण्यासाठी विविध पातळ्यांवर प्रयत्न सुरू आहेत. राज्यात प्रौढ लोकसंख्येपैकी सुमारे ८ टक्के म्हणजेच ७० लाख नागरिक कोरोना प्रतिबंधात्मक लसीच्या पहिल्या डोसपासून वंचित आहेत. 

आरोग्य विभागानुसार, राज्यातील प्रौढ लोकसंख्या ९,१४,३५,००० आहे आणि लसीकरण मोहिमेला सुरुवात झाल्यापासून, त्यापैकी ८,४४,१०,०७४ जणांनी आतापर्यंत पहिला डोस घेतला आहे. २४ मार्च रोजी पहिला डोस मिळालेल्या लाभार्थ्यांची संख्या ८,३९,९९,८७० होती, जी ८ जूनपर्यंत किंचितशी वाढली आणि ८,४४,१०,०७४ वर पोहोचली आहे.

राज्यात मुंबई - १११.६२, पुणे - ११०.४०, भंडारा - १०१.१५ आणि सिंधुदुर्ग - १००.४२ जिल्ह्यांत प्रौढ लसीकरणाची नोंद झाली आहे. कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सिनचे प्रत्येकी ४० लाख डोस आणि कॉर्बेव्हॅक्सचे आणखी ३८ लाख डोस असा जवळपास १ कोटींहून अधिक लसींचा सध्या राखीव साठा आहे. नागरिकांना कोविड प्रतिबंधात्मक लस घेण्याचे आवाहन करत आहोत. मात्र, आम्ही कोणत्याही व्यक्तीला लस घेण्यासाठी जबरदस्ती करू शकत नाही, असे राज्य लसीकरण अधिकारी डॉ. सचिन देसाई यांनी सांगितले.

जिल्हे सर्वांत कमी लसीकरण
धुळे - ८०.१९ 
अकोला - ८०.०६ 
हिंगोली - ७९.८० 
नांदेड - ७९.२१ 
बीड - ७७.९५ 
नंदूरबार - ७३.७२

Web Title: 8 percent adults in state still deprived of first dose of corona vaccine

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.