जिल्ह्यात ८ हजार दहीहंड्या

By Admin | Published: August 23, 2016 03:01 AM2016-08-23T03:01:21+5:302016-08-23T03:01:21+5:30

गोपाळकाल्याच्या दिवशी २ हजार ३७० सार्वजनिक तर ५ हजार ८०१ खाजगी अशा एकूण ८ हजार १७१ दहीहंड्या गोविंदा फोडणार

8 thousand dahihandas in the district | जिल्ह्यात ८ हजार दहीहंड्या

जिल्ह्यात ८ हजार दहीहंड्या

googlenewsNext

जयंत धुळप,

अलिबाग- रायगड जिल्ह्यात गुरु वारी २४ आॅगस्ट रोजी गोपाळकाल्याच्या दिवशी २ हजार ३७० सार्वजनिक तर ५ हजार ८०१ खाजगी अशा एकूण ८ हजार १७१ दहीहंड्या गोविंदा फोडणार असून त्यातील सर्वाधिक २६० सार्वजनिक दहीहंड्या तळा येथे तर सर्वाधिक ९०० खाजगी दहीहंड्या दिघीमध्ये आहेत. या दिवशी एकूण ५४ गोविंदा पथकांच्या मिरवणूक जिल्ह्यात असून त्यातील सर्वाधिक आठ मिरवणूक गोरेगाव येथे आहेत.
पोलादपूर शहरात २५ आॅगस्ट रोजी गुजर समाजाच्या सार्वजनिक पाच तर खाजगी सात अशा १२, महाडमध्ये गुजर समाजाची एक आणि गोरेगावमध्ये गुजराती समाजाची एक अशा एकूण १४ दहीहंड्या वैशिष्टपूर्ण परंपरेनुसार फोडण्यात येणार आहेत. गोकुळाष्टमी आणि गोपाळकाल्याच्या निमित्ताने कोणताही अनुचित प्रकार घडू नये याकरिता जिल्ह्यात शांतता समित्याच्या बैठका घेण्यात आल्या आहेत तर या दिवशी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला असल्याची माहिती रायगडचे जिल्हा पोलीस अधीक्षक मो.सुवेझ हक यांनी दिली आहे.
>पोलीस कार्यक्षेत्रातील दहीहंड्या व मिरवणुका
कर्जत सार्वजनिक १५, खाजगी ९० दहीहंड्या आणि १ मिरवणूक, नेरळ ६५ सार्वजनिक, १५५ खाजगी, २ मिरवणुका , माथेरान ७ सार्वजनिक, खालापूर ११ सार्वजनिक, १९० खाजगी, खोपोली ६० सार्वजनिक, ५५ खाजगी, मिरवणुका २, रसायनी १०५ सार्वजनिक, १४० खाजगी, पेण १११ सार्वजनिक , २७० खाजगी, ४ मिरवणुका, दादर(पेण) सार्वजनिक ४५, खाजगी १५०, पोयनाड सार्वजनिक ९४, खाजगी ६४, मिरवणुका ३. वडखळ १३५सार्वजनिक, १५० खाजगी, अलिबागसार्वजनिक १०५, खाजगी ३६०, मिरवणुका २, रेवदंडा १३० सार्वजनिक, २५६ खाजगी, ३ मिरवणुका, मुरुड १४२ सार्वजनिक, १९१ खाजगी, ३ मिरवणुका, मांडवा सार्वजनिक ७५, खाजगी १७०, मिरवणूक १, रोहा सार्वजनिक १६८, खाजगी ७३, मिरवणूक ७, कोलाड सार्वजनिक ६९, खाजगी ५८, मिरवणूक १, नागोठणे सार्वजनिक ५२,खाजगी २३५, पाली सार्वजनिक ११७, खाजगी ४८, मिरवणूक ३, माणगांव सार्वजनिक १७, खाजगी ३१२, मिरवणूक ६, गोरेगांव सार्वजनिक २६, खाजगी ९२, मिरवणूक ८, तळा सार्वजनिक २६०, खाजगी२२, मिरवणूक ४, श्रीवर्धन सार्वजनिक ६८, खाजगी ८७३, म्हसळा सार्वजनिक ८९, खाजगी ५३५, दिघी सार्वजनिक ३५, खाजगी ९००, मिरवणूक ३, महाड शहर सार्वजनिक ६५, खाजगी१४४, मिरवणूक १, महाड तालुका सार्वजनिक १०५ खाजगी ११३, बिरवाडी सार्वजनिक ८६, खाजगी ७०, पोलादपूर सार्वजनिक ११३, खाजगी १३८, एकूण सार्वजनिक २,३७०, खाजगी ५,८०१ मिरवणुका ५४

Web Title: 8 thousand dahihandas in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.