८ हजार विहिरींना मिळणार जीवनदान
By admin | Published: November 18, 2015 02:18 AM2015-11-18T02:18:16+5:302015-11-18T02:18:16+5:30
धडक सिंचन विहीर योजनेचे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतून होणारे बांधकाम अपूर्ण राहिल्यामुळे बंद पडलेल्या विहिरी पुन्हा सुरू करण्याचा निर्णय शासनाच्या
बुलडाणा : धडक सिंचन विहीर योजनेचे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतून होणारे बांधकाम अपूर्ण राहिल्यामुळे बंद पडलेल्या विहिरी पुन्हा सुरू करण्याचा निर्णय शासनाच्या जलसंपदा विभागाने १० नोव्हेंबर रोजी घेतला. त्यामुळे अमरावती, अकोला, बुलडाणा, वाशिम, यवतमाळ व वर्धा या सहा जिल्ह्यांमध्ये बंद असलेल्या ८ हजार ७ विहिरींना पुन्हा जीवनदान मिळणार आहे.
या योजनेंतर्गत आतापर्यंत ३५ हजार विहिरी पूर्ण झाल्या आहेत. बांधकाम अपूर्ण राहिल्यामुळे सहा जिल्ह्यांतील ८ हजार ७ विहिरींचे बांधकाम धडक सिंचन विहीर योजनेंतर्गत पुन्हा सुरू करण्यात येणार आहे. आवश्यकतेनुसार कुशल कामासाठी लागणारा अतिरिक्त निधी रोहयोच्या निधीतून उपलब्ध करून देण्यात येणार आहे. अपूर्ण विहिरी ३० एप्रिल २०१६पर्यंत पूर्ण करण्यात येतील. (प्रतिनिधी)