ऑल वुमेन आर्मी, मुंबईतील 'या' पोलीस स्टेशन्सची धुरा सांभाळणार 8 महिला अधिकारी
By ऑनलाइन लोकमत | Published: April 2, 2018 01:10 PM2018-04-02T13:10:50+5:302018-04-02T13:10:50+5:30
देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच मुंबईकरांच्या सुरक्षेची जबाबदारी महिलांच्या स्वाधीन करण्यात आली आहे. मुंबईतल्या आठ मोठ्या पोलीस स्टेशनचा कार्यभार महिलांकडे सोपवण्यात आला आहे.
मुंबई- देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच मुंबईकरांच्या सुरक्षेची जबाबदारी महिलांच्या स्वाधीन करण्यात आली आहे. मुंबईतल्या आठ मोठ्या पोलीस स्टेशनचा कार्यभार महिलांकडे सोपवण्यात आला आहे. त्यामुळे 8 पोलीस स्टेशनची आता संपूर्ण जबाबदारी असलेलं मुंबई हे देशातील पहिलं शहर म्हणून समोर आलं आहे. मुंबई पोलिसांनी या कर्तृत्ववान महिलांचा सोशल मीडियावर फोटो शेअर केला आहे.
आठ पोलीस स्टेशनवर या कर्तबगार महिलांचा वरचष्मा असणार आहे. पोलिसांनी महिलांच्या या यशाला नव्या कर्तृत्वाचा आयाम दिला आहे. या महिलांनी अनेक अडचणींचा सामना करत स्वतःच्या परिसराला गुन्ह्यांवर अंकुश ठेवण्याचा यशस्वी प्रयत्न केला आहे. त्यामुळेच मुंबई पोलीस आयुक्तांनी या 8 महिलांवर मुंबईतल्या महत्त्वाच्या पोलीस स्टेशन्सची जबाबदारी सोपवली आहे. संवेदनशील असलेल्या एअरपोर्ट पोलीस स्टेशनची जबाबदारी अलका मांडवी यांच्यावर सोपवली आहे. तर वरिष्ठ पोलीस निरीक्षक रश्मी जाधव यांना कप परेड पोलीस स्टेशनचा चार्ज देण्यात आला आहे.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक मृदुला लाड यांच्या हवाली सायन पोलीस स्टेशन करण्यात आलं आहे. तर आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळचं सहार पोलीस स्टेशन लता शिरसत यांच्याकडे सोपवण्यात आलं आहे. गोरेगावातल्या वनराई पोलीस स्टेशनचा चार्ज ज्योत्स्ना रसम यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला आहे. रोहिणी काळेंना पंतनगर पोलीस स्टेशन, तर विद्यालक्ष्मी हिरेमट यांच्याकडे आरे पोलीस स्टेशनचा कार्यभार देण्यात आला आहे. तर कल्पना गडेकर यांच्यावर बीकेसी पोलीस स्टेशनची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
Trying to keep up with the city’s trend of setting examples! #InspiredByMumbaipic.twitter.com/cEyEu7GOmg
— Mumbai Police (@MumbaiPolice) March 31, 2018
या महिला पोलीस निरीक्षकांची सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात स्तुती केली जातेय. सोशल मीडियावर या महिला पोलिसांचे फोटो अनेकांनी शेअर केले आहेत. फेसबुक आणि ट्विटरसारख्या माध्यमांवर युझर्सनी महिला सशक्तीकरणाचं नाव देत हे फोटो अपलोड करत मुंबई पोलिसांचे आभारही व्यक्त केले आहेत.
Trying to keep up with the city’s trend of setting examples! #InspiredByMumbaipic.twitter.com/cEyEu7GOmg
— Mumbai Police (@MumbaiPolice) March 31, 2018
Trying to keep up with the city’s trend of setting examples! #InspiredByMumbaipic.twitter.com/cEyEu7GOmg
— Mumbai Police (@MumbaiPolice) March 31, 2018