स्वतंत्र विदर्भाच्या बाजूने ८० टक्के जनता - श्रीहरी अणे यांचे वक्तव्य
By admin | Published: December 6, 2015 06:21 PM2015-12-06T18:21:55+5:302015-12-06T18:23:22+5:30
स्वतंत्र विदर्भ व्हावा की नाही याचे उत्तर केवळ विदर्भातील जनताच देऊ शकते, त्यामुळे या मुद्यावर जनचाचणी घेण्यात यावी, असे वक्तव्य राज्याचे महाधिवक्ता व ज्येष्ठ विधीज्ञ श्रीहरी अणे यांनी केले.
Next
ऑनलाइन लोकमत
नागूपर, दि. ६ - हिवाळी अधिेवेशन सुरू होण्यास अवघा एक दिवस उरला असतानाच स्वंतत्र विदर्भाचा मुद्दा पुन्हा चर्चेत येण्याची चिन्हे आहेत. ' स्वतंत्र विदर्भ व्हावा की नाही याचे उत्तर केवळ विदर्भातील जनताच देऊ शकते, त्यामुळे या मुद्यावर जनचाचणी घेण्यात यावी, असे वक्तव्य राज्याचे महाधिवक्ता व ज्येष्ठ विधीज्ञ श्रीहरी अणे यांनी केले आहे. विशेष म्हणजे अशी जनचाचणी झाल्यास ८० टक्के जनता ही स्वतंत्र विदर्भाच्या बाजूनेच मत देईल, असा दावाही त्यांनी केला.
नागपूरमध्ये ‘विदर्भगाथा’ या पुस्तकाच्या प्रकाशनावेळी ते बोलत होते. वेगळ्या विदर्भाच्या नावावर तेलंगणाप्रमाणे केवळ हिंसक आंदोलन अभिप्रेत असल्याची टीकाही अणे यांनी केली.
अणे यांच्या वक्तव्याचे लगेच पडसाद उमटले असून त्यांचे हे वक्तव्य महाराष्ट्रद्रोही असल्याचे सांगत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी त्यांच्यावर टीकास्त्र सोडले. ‘अणें यांनी केलेल वक्तव्य अखंड महाराष्ट्राच्या संकल्पनेला तडा देणारे आहे. ते संपूर्ण महाराष्ट्राचे महाधिवक्ता आहेत, विदर्भाचे नाही. त्यामुळे त्यांच्या पदावरच्या व्यक्तीला हे विधान अशोभनीय आहे' असे सांगत राऊत यांनी अणे यांच्या राजीनाम्याची मागणी केली.