विद्यार्थ्यांनी स्पर्धेच्या माध्यमातून घडविल्यात ८० शाडूच्या गणेशमुर्ती!
By admin | Published: September 1, 2016 01:58 PM2016-09-01T13:58:43+5:302016-09-01T13:58:43+5:30
राणी लक्ष्मीबाई कन्या शाळेतील विद्यार्थींनींनी गणेशोत्सवामध्ये पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा हेतू ठेवून शाडूच्या मातीचे गणेश साकारले.
Next
>ऑनलाइन लोकमत
नंदकिशोर नारे
वाशिम, दि. १ - शहरातील सर्वात जुनी शाळा म्हणून प्रसिध्द असलेल्या राणी लक्ष्मीबाई कन्या शाळेतील विद्यार्थींनींनी गणेशोत्सवामध्ये पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा हेतू ठेवून शाडूच्या मातीचे गणेश साकारले. शाळेत यानिमित्त स्पर्धेचे आयोजन करुन विद्यार्थ्यांना पर्यावरणाचा ºहास होणार नाही यावर मार्गदर्शन करुन शाडुच्या मातीचे गणेश मुर्त्या बनविण्याची स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. यामध्ये चक्क ८० विद्यार्थ्यांनी सहभाग घेवून आकर्षक श्री गणेश साकारलेत. राणी लक्ष्मीबाई कन्या शाळेत दरवर्षी राष्टÑीय हरित सेनेच्यावतिने ही स्पर्धा आयोजित करण्यात येते. गतवर्षी ६० विद्यार्थींनीचा तर यावर्षी ८० विद्यार्थीनींना सहभाग दर्शविला होता. कोवळया मनावर पर्यावरण रक्षणाचा विचार रुजविण्यासाठी आकर्षक बक्षिसे ठेवून शाळेच्यावतिने स्पर्धा घेण्यात येते. या स्पर्धेत जास्तीत जास्त विद्यार्थ्यांचा सहभाग व्हावा म्हणून याकरिता अमोल काटेकर, प्रशांत बोरकर, मुख्याध्यापिका स्वाती कुळकर्णी, राष्टÑीय हरित सेनेचे प्रभारी उपमुख्याध्यापक सुरेश खरावन, पर्यवेक्षिका शिला वजीरेसह शिक्षक वृंदानी प्रोत्साहित केले. स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक पूजा कैलास चोपडे, व्दितीय महेक मेहता, तृतीय सानिका अनसिंगकर तर प्रोत्साहनपर बक्षिसे पुष्करणी गोटे, पुजा दाभाडे, गायत्री लक्रस यांना देण्यात आले. यावेळी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अॅड. मधुकरराव अनसिंगकर , संचालक मंडळाने मुर्तींचे अवलोकन करुन विद्यार्थ्यांचे कौतूक केले.