नदीतून काढले ८० हजार किलो प्लास्टिक

By admin | Published: April 3, 2017 02:53 AM2017-04-03T02:53:14+5:302017-04-03T02:53:14+5:30

मुंबईतील मिठी, ओशिवरा, पोईसर आणि दहिसर नद्यांच्या संवर्धनासाठी रिव्हर मार्चने पुढाकार घेतला

80 thousand kg of plastic removed from the river | नदीतून काढले ८० हजार किलो प्लास्टिक

नदीतून काढले ८० हजार किलो प्लास्टिक

Next

मुंबई : मुंबईतील मिठी, ओशिवरा, पोईसर आणि दहिसर नद्यांच्या संवर्धनासाठी रिव्हर मार्चने पुढाकार घेतला असून, या उपक्रमांतर्गत रविवारी पोईसर नदीतून तब्बल ८० हजार किलो प्लास्टिक काढण्यात आले आहे. रिव्हर मार्च, महापालिका आणि खासगी विकासकांच्या माध्यमातून हे काम करण्यात आले असून, ही तर सुरुवात असल्याची प्रतिक्रिया रिव्हर मार्चच्या कार्यकर्त्यांनी दिली आहे.
मुंबईमधील चारही नद्यांच्या संवर्धनाचा कार्यक्रम रिव्हर मार्चने हाती घेतला आहे. विशेष म्हणजे या उपक्रमाला मुंबईकरांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असून, महापालिकाही त्यांना सहकार्य करत आहे. जलपुरुष डॉ. राजेंद्र सिंह हे स्वत: रिव्हर मार्चचे नेतृत्व करत असून, त्यांनीही यापूर्वी नद्यांच्या संवर्धनासाठी मुंबईतील कार्यक्रमांना हजेरी लावली आहे. (प्रतिनिधी)
स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, आतापर्यंत अशा स्वरूपात नदीची साफसफाई झालेली नाही. दरवर्षीप्रमाणे कंत्राटदार येतात कचरा काढतात. तोच कचरा नदीच्या किनाऱ्याला ठेवला जातो.
मग हाच कचरा पावसाळ्यात पुन्हा नदीच्या पात्रात जमा होतो. दरम्यान, दर रविवारी नदी सफाई केली जाणार असून, मुंबईकरांनी यात सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.नदीच्या तळाला ६ फुटांच्या अंतरापर्यंत कचऱ्याचा थर जमा झालेला आहे. एवढा मोठा थर जमा झालेला असताना नदीचे पाणी हे जमिनीमध्ये कसे जिरेल? जेव्हा सगळा कचरा काढला जाईल तेव्हा खऱ्या अर्थाने नदीचे पाणी जमिनीत मुरेल. मग पुन्हा नदीला जीवदान मिळेल. महापालिकेने यासाठी चार ट्रकची व्यवस्था केली असून, दोन जेसीबीची मदत घेतली जात आहे
>नागरिकांना दिलासा
दिंडोशीच्या मालाड (पूर्व) प्रभाग क्रमांक ३८ येथील आप्पापाड्यातील सावित्रीबाई फुलेनगर ते क्रांतीनगर-गोकूळनगर येथील मुख्य नाल्याच्या कामाला नुकतीच सुरुवात झाली आहे. त्यामुळे तेथील नाल्याच्या आजूबाजूला राहणाऱ्या नागरिकांना सतत भेडसावणाऱ्या या त्रासातून मोठा दिलासा मिळाला आहे. दरम्यान, या कामासाठी महापालिकेच्या पर्जन्य जलवाहिनी विभागाकडून २४ कोटींचा निधी मंजूर झाला आहे. नाल्याच्या कामाचा शुभारंभ झाला; त्या वेळी येथे माजी आरोग्य समिती अध्यक्ष प्रशांत कदम, नगरसेवक आत्माराम चाचे, ग्राहक संरक्षण कक्षाचे विनायक राऊत, सतीश यादव, गणेश घोले उपस्थित होते.

Web Title: 80 thousand kg of plastic removed from the river

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.