बापरे! 80 वर्षांच्या वृद्धाला तब्बल 80 कोटींचे वीज बिल पाठविले; आजोबांना थरमरीच भरली
By ऑनलाइन लोकमत | Published: February 24, 2021 04:59 PM2021-02-24T16:59:54+5:302021-02-24T17:02:40+5:30
Electricity bill Shock to old man Ganpat Naik : नालासोपाऱ्याच्या निर्मल गावात राईस मिल चालविणाऱ्या एका 80 वर्षांच्या वृद्धाला सोमवारी विज वितरण कंपनीने १० पंधरा हजार नव्हे तर चक्क 80 कोटींचे बिल पाठवून दिले आहे. हा आकडा पाहताच हे मिल मालक गणपत नाईक यांचे डोळेच पांढरे झाले.
राज्यात महावितरणने थकबाकी असलेल्यांची वीज खंडीत करण्याची कारवाई सुरु केली आहे. कोरोना लॉकडाऊन काळात अव्वाच्या सव्वा बिले काढून सामान्यांना वेठीस धरले आहे. राज्यभरात आता वसुली सुरु केली असून वीज जाण्याच्या भीतीने लोक हळूहळू का होईना हप्त्यांमध्ये ही बिले भरू लागले आहेत. अशातच मुंबईच्या नालासोपाऱ्यातून एक खळबळजनक बातमी आली आहे. ( 80-year-old Ganpat Naik, who runs a rice mill in Nirmal village of Nalasopara town, Maharahstra on Monday received a whopping electricity bill of over Rs 80 crore)
नालासोपाऱ्याच्या निर्मल गावात राईस मिल चालविणाऱ्या एका 80 वर्षांच्या वृद्धाला सोमवारी विज वितरण कंपनीने १० पंधरा हजार नव्हे तर चक्क 80 कोटींचे बिल पाठवून दिले आहे. हा आकडा पाहताच हे मिल मालक गणपत नाईक यांचे डोळेच पांढरे झाले. उच्च रक्तदाब असल्याने त्यांना थरमरी भरली. यामुळे त्यांना हॉस्पिटलाईज करावे लागल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.
2001 पासून त्यांची तांदळाला पॉलिश करण्याची मिल आहे. तेव्हापासून कधी 6 कधी सात हजार तर कधी पन्नास हजार असे वापरानुसार बिल यायचे. ते गणपत नाईक नियमित भरत होते. मात्र, कोरोना काळापासून त्यांची मिल बंद होती. त्यांनी त्यातील मशिनरीदेखील विकल्याने मिल रिकामी आहे. तरीदेखील त्यांना 80 कोटींचे बिल महावितरणने (Maharashtra State Electricity Distribution Company Limited (MSEDCL)) पाठविल्याने धक्का बसला आहे.
यावर महिवितरणला विचारले असता त्यांनी ही तांत्रिक चूक असल्याचा खुलासा केला आहे. तसेच गणपत नाईंकांचे वीज बिल हे 80 कोटी नाही तर 6,400 रुपये असल्याची सारवासारव केली आहे. गणपत नाईक हे बिल भरतीलही, परंतू त्यांना जो मानसिक त्रास, ताण सहन करावा लागला, त्यांचे जे नुकसान झाले ते कोण भरून देणार असा प्रश्न पडला आहे.
महावितरण कंपनीकडून लॉकडाऊनकाळात अवाढव्य वीज बिले देण्यात आली असून या बिलांची सक्तीने वसुली सुरू आहे. बिल अदा न करणाऱ्या नागरिकांचा वीजपुरवठा खंडित केला जात आहे. हा प्रकार संतापजनक असून सरकारने तो तातडीने थांबवावा, अन्यथा जनतेतून उद्रेक होईल, असा इशारा भाजपाने दिला आहे.