ससूनमध्ये मुलाखती घेऊन ८०० जणांची फसवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 9, 2018 03:15 AM2018-03-09T03:15:05+5:302018-03-09T03:15:05+5:30
राज्यातील १६ वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये विविध पदांवर नोकरी लावण्याच्या आमिषाने नोकरी राज्यातील ८०० उमेदवारांची सुमारे ३० कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला़ या घोटाळ्याचा मुख्य सुत्रधार भारतीय जनता पक्षाचे नवी मुंबईचे महामंत्री जितेंद्र बंडु भोसले असल्याचा आरोप माजी सैनिक विकास परिषदेचे अध्यक्ष सुधाकरन पणीकरन यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत केला़
पुणे - राज्यातील १६ वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये विविध पदांवर नोकरी लावण्याच्या आमिषाने नोकरी राज्यातील ८०० उमेदवारांची सुमारे ३० कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला़ या घोटाळ्याचा मुख्य सुत्रधार भारतीय जनता पक्षाचे नवी मुंबईचे महामंत्री जितेंद्र बंडु भोसले असल्याचा आरोप माजी सैनिक विकास परिषदेचे अध्यक्ष सुधाकरन पणीकरन यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत केला़
यावेळी फसवणूक झालेले महिला उमेदवार सारिका चव्हाण, मधुकरन भाकरे आदी उपस्थित होते़ या बाबत पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांना गुन्हा दाखल करण्यासंबंधी निवेदन देण्यात आले आहे़ राज्यातील वैद्यकीय शिक्षण विभागातील १६ महाविद्यालयांमधील वरिष्ठ लिपिक, कनिष्ठ लिपिक, प्रयोगशाळा सहाय्यक, इलेक्ट्रीशन आदि विविध पदांसाठी जागा सुटल्याचे विविध एजंटानी सांगितले होते़ त्यावर विश्वास ठेवून या उमेदवारांनी एजंटनी दाखविलेले राज्य शासनाचे परिपत्रकही पाहिले होते़
हा घोटाळा २०१६ ते २०१८ दरम्यान घडला असून त्यात बीड, उस्मानाबाद, परभणी, नागपूर, सोलापूर येथील फसवणूक झालेल्या उमेदवारांची संख्या लक्षणीय आहे़ उमेदवारांच्या पुण्यातील ससून रुग्णालयात नोकरीसाठी मुलाखती घेण्यात आल्या होत्या़ मात्र, नंतर हा प्रकार खोटा असल्याचे आढळून आले़