अकरावीच्या दुसऱ्या यादीत ८०,१४१ विद्यार्थ्यांना प्रवेश!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2017 02:33 AM2017-07-21T02:33:00+5:302017-07-21T02:33:00+5:30
अकरावी प्रवेशाची दुसरी आॅनलाइन गुणवत्ता यादी बुधवारी रात्री जाहीर झाली. या यादीत एकूण ८० हजार १४१ विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आले आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : अकरावी प्रवेशाची दुसरी आॅनलाइन गुणवत्ता यादी बुधवारी रात्री जाहीर झाली. या यादीत एकूण ८० हजार १४१ विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आले आहेत. यादीमध्ये १८ हजार ४६८ विद्यार्थ्यांना पहिल्या पसंतीचे महाविद्यालय मिळाले आहे. दुसऱ्या यादीसाठी एकूण १ लाख १७ हजार २८६ विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते. उरलेल्या विद्यार्थ्यांना आता तिसऱ्या गुणवत्ता यादीची प्रतीक्षा करावी लागणार आहे.
पहिल्या पसंतीचे महाविद्यालय मिळालेल्या विद्यार्थ्यांनी २१ ते २४ जुलैदरम्यान संबंधित महाविद्यालयात जाऊन पूर्ण शुल्क भरून प्रवेश निश्चित करायचा आहे. प्रवेश निश्चित झाल्याची संगणकीकृत पावती संबंधित महाविद्यालयाकडून घेण्याचे आदेशही मुंबई विभागीय शिक्षण उपसंचालकांनी दिले आहेत.
दुसऱ्या यादीत ८० हजार १४१ विद्यार्थ्यांना प्रवेश जाहीर करण्यात आले आहेत. त्यामुळे सुमारे ३७ हजार १४५ विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी २९ जुलै रोजी होणाऱ्या तिसऱ्या गुणवत्ता यादीची प्रतीक्षा करावी लागणार आहे. दरम्यान, पहिल्या गुणवत्ता यादीनंतर व्यवस्थापन, इन-हाउस, अल्पसंख्याक आणि द्विलक्षी अभ्यासक्रमाच्या कोट्यातून एकूण ३५ हजार ८१२ विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाले आहेत.
कुठे घट, तर कुठे वाढपहिल्या गुणवत्ता यादीच्
या तुलनेत रुईया महाविद्यालयाची कला शाखेची दुसरी यादी तीन टक्क्यांनी वाढली असून, विज्ञान शाखेची यादी मात्र दोन टक्क्यांनी घसरली आहे. एचआर महाविद्यालयाची दुसरी यादी पहिल्या यादीच्या तुलनेत सुमारे आठ टक्क्यांनी वाढली आहे. त्यामुळे तिसऱ्या यादीत नामवंत महाविद्यालयांची यादी घसरणार की वाढणार याबाबत विद्यार्थीही संभ्रमात आहेत.
अकरावीची दुसरी गुणवत्ता यादी
झेव्हियर्स महाविद्यालय
विज्ञान : ८६.२
कला : ९३.८
केसी महाविद्यालय
विज्ञान : ८२.२
वाणिज्य : ८८.४
कला : ८२.८
रूईया महाविद्यालय
विज्ञान : ९२.८॰
कला : ९॰.६॰
मिठीबाई महाविद्यालय
विज्ञान : ८२.२४
वाणिज्य : ८७.८
कला : ८३.८
रूपारेल महाविद्यालय
विज्ञान : ८८.७
वाणिज्य : ८७
कला : ८२.६
साठे महाविद्यालय
विज्ञान : ८७.८
वाणिज्य : ८५.८
कला : ७७.४
शाखानिहाय जाहीर
झालेल्या प्रवेशाची आकडेवारी
शाखाअलॉटमेंट जागा
कला६ हजार २३९
विज्ञान२७ हजार ७५७
वाणिज्य४९ हजार ३१४
एचएसव्हीसी ८३१
- याआधी पहिल्या गुणवत्ता यादीमध्ये ७९ हजार ७१५ विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाले होते.