मुंबईतील 813 शेतकऱ्यांचा सातबारा होणार कोरा

By admin | Published: July 4, 2017 09:44 AM2017-07-04T09:44:14+5:302017-07-04T09:44:14+5:30

मुंबईतील 813 शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होणार, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.

813 farmers in Mumbai will face seven-fold | मुंबईतील 813 शेतकऱ्यांचा सातबारा होणार कोरा

मुंबईतील 813 शेतकऱ्यांचा सातबारा होणार कोरा

Next

ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. 4- राज्य सरकारने शेतकरी कर्जमाफी जाहीर करून शेतकऱ्यांचं दीड लाखांपर्यंतचं कर्ज माफ केलं आहे. तसंच प्रत्येक शेतकऱ्याचा सातबारा कोरा होणार अशी ग्वाहीसुद्धा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. आता मुंबईतील 813 शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होणार, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.  कुठल्या जिल्ह्यात किती शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार, याबाबतची सविस्तर आकडेवारी मुख्यमंत्री कार्यालयाने आपल्या ट्विटर हँडलवरुन जाहीर केली आहे. विशेष म्हणजे मेट्रोसिटी म्हणवल्या जाणाऱ्या मुंबईतील 813 शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळाल्याचा उल्लेख या आकडेवारीत आहे. मुंबईतही शेकडो शेतकरी शेती करीत असून राज्य सरकारच्या कर्जमाफीचा फायदा या शेतकऱ्यांना होणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज सन्मान योजने अंतर्गत  मुंबईतील 813 शेतकऱ्यांचा सातबारा आता कोरा होणार आहे. यामध्ये मुंबई शहरातील 694 शेतकऱ्यांना, तर मुंबई उपनगरातील 119 शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यात आली आहे. 
 
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काही दिवसापूर्वीच राज्यातील शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची घोषणा केली होती. राज्य सरकारने दिलेली कर्जमाफी ही इतर राज्यांच्या तुलनेत सर्वात मोठी कर्जमाफी आहे, असा दावाही देवेंद्र फडणवीस यांनी केला होता. मुख्यमंत्री कार्यालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीत दीड लाखापर्यंत कर्ज असलेले शेतकरी आणि सातबारा पूर्णपणे कोरा होणार आहेत, अशा शेतकऱ्यांचीही आकडेवारी सांगितली आहे. छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत राज्यातील ३५ जिल्ह्यांतील ३६ लाख १० हजार २१६ शेतकऱ्यांना याचा फायदा मिळणार आहे. 
 
राज्यातील बुलडाणा जिल्ह्यात सर्वात जास्त २ लाख ४९ हजार ८१८ शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार असून यवतमाळ जिल्ह्याचा दुसरा क्रमांक यात लागला आहे. यवतमाळमधील २ लाख ४२ हजार ४७१ शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होणार आहे. तर ठाणे जिल्ह्यातील सर्वात कमी म्हणजेच २३ हजार ५०५ शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार आहे. 1 एप्रिल 2012  ते 30 जून 2016 या कालावधीत थकबाकी असलेल्या शेतकऱ्यांना दीड लाख रुपयांपर्यंतचे कर्ज सरसकट माफ करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घेतला.
 
दरम्यान, कोणत्या गावातील किती शेतकऱ्यांचा सातबारा कोरा झाला, हे सगळ्या शेतकऱ्यांना कळलं पाहिजे आणि 40 लाख कर्जमुक्त शेतकऱ्यांची यादी जाहीर केली पाहिजे, अशी मागणी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली होती. म्हणुनच मुख्यमंत्री कार्यालयाकडून ही यादी जाहीर करण्यात आली आहे, असं बोललं जातं आहे. 
 
इतक्या शेतकऱ्यांचा सातबारा होणार कोरा
 
अहमदनगर – 2 लाख 869
औरंगाबाद – 1 लाख 48 हजार 322
बुलडाणा – 2 लाख 49 हजार 818
गडचिरोली – 29 हजार 128
जळगाव – 1 लाख 94 हजार 320
लातूर – 80 हजार 473
नागपूर – 84 हजार 645
नाशिक – 1 लाख 36 हजार 569
परभणी – 1 लाख 63 हजार 760
रत्नागिरी – 41 हजार 261
सिंधुदुर्ग – 24 हजार 447
वाशिम – 45 हजार 417
अकोला – 1 लाख 11 हजार 625
बीड – 2 लाख 8 हजार 480
चंद्रपूर – 99 हजार 742
गोंदिया – 68 हजार 290
जालना – 1 लाख 96 हजार 463
मुंबई शहर – 694
मुंबई उपनगर – 119
नांदेड – 1 लाख 56 हजार 849
उस्मानाबाद – 74 हजार 420
पुणे – 1 लाख 83 हजार 209
सांगली – 89 हजार 575
सोलापूर – 1 लाख 8 हजार 533
यवतमाळ – 2 लाख 42 हजार 471
अमरावती – 1 लाख 72 हजार 760
भंडारा – 42 हजार 872
धुळे – 75 हजार 174
हिंगोली – 55 हजार 165
कोल्हापूर – 80 हजार 944
नंदूरबार – 33 हजार 556
पालघर – 918
रायगड – 10 हजार 809
सातारा – 76 हजार 18
ठाणे – 23 हजार 505
 
 
 

Web Title: 813 farmers in Mumbai will face seven-fold

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.