अपघातग्रस्त विद्यार्थ्यांसाठी ८.१९ कोटींचा निधी!

By Admin | Published: July 6, 2016 01:26 AM2016-07-06T01:26:17+5:302016-07-06T01:26:17+5:30

निधीअभावी धूळ खात पडलेली अपघातग्रस्त विद्यार्थ्यांंच्या नुकसानभरपाईची ११५५ प्रकरणे लवकरच निकाली निघणार.

8.19 crore fund for accident victims! | अपघातग्रस्त विद्यार्थ्यांसाठी ८.१९ कोटींचा निधी!

अपघातग्रस्त विद्यार्थ्यांसाठी ८.१९ कोटींचा निधी!

googlenewsNext

संतोष वानखडे / वाशिम
निधीअभावी धूळ खात पडलेली राज्यातील अपघातग्रस्त विद्यार्थ्यांंच्या नुकसानभरपाईची ११५५ प्रकरणे लवकरच निकाली निघण्याची चिन्हे आहेत. शिक्षण विभागाने ८.१९ कोटींचा निधी मंजूर केला असून, जिल्हास्तरावर निधी वितरणाची कार्यवाही सुरू आहे.
विद्यार्थ्यांंच्या सुरक्षित शिक्षणासाठी शिक्षण विभागाने विविध योजना व उपक्रम अमलात आणले आहेत. इयत्ता पहिली ते बारावीपर्यंंतच्या विद्यार्थ्यांंना संकटसमयी आर्थिक मदतीचा हात म्हणून २0१२-१३ पासून राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह अनुदान योजना नियमितपणे राबविण्यात येत आहे. शिक्षण घेताना अपघात झाला तर संबंधित विद्यार्थ्याला आर्थिक स्वरूपात भरपाई दिली जाते. अपघाताचे स्वरूप पाहून आर्थिक नुकसानभरपाईची रक्कम निश्‍चित केली जाते. अपघातग्रस्त विद्यार्थ्याने संबंधित शाळेच्या मुख्याध्यापक किंवा प्राचार्यांंमार्फत गटशिक्षणाधिकारी आणि गटशिक्षणाधिकार्‍याने माध्यमिक किंवा प्राथमिक शिक्षणाधिकारी कार्यालयात नुकसानभरपाईचा प्रस्ताव सादर करणे आवश्यक आहे.
२0१५-१६ या वर्षात राज्यभरातून दीड हजारावर प्रस्ताव प्राप्त झाले होते; मात्र पुरेशा प्रमाणात निधी उपलब्ध नसल्याने ११५५ प्रस्ताव धूळ खात पडले होते. यामध्ये वाशिम जिल्हय़ातील ३५ विद्यार्थ्यांंचा समावेश आहे. निधीअभावी या अपघातग्रस्त विद्यार्थ्यांंना भरपाईच्या रकमेची केवळ प्रतीक्षाच करावी लागली.
विविध संघटनांनी शासनाकडे पाठपुरावा केल्याने जूनच्या तिसर्‍या आठवड्यात ८ कोटी १९ लाख ९३ हजार ६00 रुपये मंजूर करण्यात आले. सदर निधी आता जिल्हास्तरावर वितरित केला जात असून, लवकरच पात्र विद्यार्थ्यांंना नुकसानभरपाईची रक्कम मिळणार आहे. या निधीवर नियंत्रण अधिकारी म्हणून शिक्षण आयुक्तांवर जबाबदारी सोपविण्यात आली असून, जिल्हास्तरावर शिक्षणाधिकारी पात्र विद्यार्थ्यांंना निधीचे वितरित करणार आहेत.

Web Title: 8.19 crore fund for accident victims!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.