दीड लाखापर्यंत कर्जमाफीमुळे 82 टक्के शेतक-यांचा सातबारा होणार कोरा - मुख्यमंत्री

By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2017 02:01 PM2017-07-27T14:01:18+5:302017-07-27T14:19:16+5:30

कर्जाच्या फे-यात अडकलेल्या शेतक-याची सुटका करण्यासाठी कर्जमुक्ती एक तोडगा आहे पण हा कायमस्वरुपी उपाय असू शकत नाही.

82 percent farmers get direct benefit of loan waiver scheme | दीड लाखापर्यंत कर्जमाफीमुळे 82 टक्के शेतक-यांचा सातबारा होणार कोरा - मुख्यमंत्री

दीड लाखापर्यंत कर्जमाफीमुळे 82 टक्के शेतक-यांचा सातबारा होणार कोरा - मुख्यमंत्री

googlenewsNext
ठळक मुद्दे शेतक-याची सुटका करण्यासाठी कर्जमुक्ती एक तोडगा आहेशेतक-यांची कायमस्वरुपी कर्जाच्या फे-यातून सुटका करण्यासाठी आमचे प्रयत्न कर्ज परतफेडीसाठी शेतक-याला सक्षम करणार

मुंबई, दि. 27 - कर्जाच्या फे-यात अडकलेल्या शेतक-याची सुटका करण्यासाठी कर्जमुक्ती एक तोडगा आहे पण हा कायमस्वरुपी उपाय असू शकत नाही. शेतक-यांची कायमस्वरुपी कर्जाच्या फे-यातून सुटका करण्यासाठी आमचे प्रयत्न सुरु आहेत असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी विधानपरिषदेत कर्जमाफीवरील चर्चेला उत्तर देताना सांगितले. कर्जमाफी हा केवळ पहिला टप्पा आहे. 

कर्ज परतफेडीसाठी शेतक-याला सक्षम करणार असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. कोणाच्या ताब्यात किती जमीन आहे याचा विचार करुन सरसकट दीड लाखापर्यंत कर्जमाफी दिली नसल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. दीड लाखापर्यंतच्या कर्जमाफीचा राज्यातील 82 टक्के शेतक-यांना फायदा होणार असून, त्यांचा सातबारा कोरा होईल असा दावा मुख्यमंत्र्यांनी केला. 

दीड ते दोन लाखा दरम्यान कर्ज घेणारे तीन लाख शेतकरी असून त्यांनी देखील 15 ते 20 हजारापर्यंत रक्कम भरली तर ते सुद्धा कर्जमुक्त होतील असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. नियमित कर्ज फेडणा-यांनाही लाभ देण्यात येईल अशी घोषणा यावेळी मुख्यमंत्र्यांनी केली. 

- कर्जमाफीचा फॉर्म सोपा असून कोणीही भरु शकतं. 

 - शेतक-यांना त्यांच्या मोबाईलवरुनही कर्जमाफीचा फॉर्म भरता यावा यासाठी येत्या  दोन ते तीन दिवसात नवी अॅप लाँन्च करणार. 

- 2008-09 मध्ये मुंबईतच जास्त कर्जमाफी झाली.

- 2009 च्या कर्जमाफीची पूर्ण यादीच मिळत नाही.

- ज्या शेतक-यांनी त्यांची कर्ज पुर्नगठीत करुन घेतली त्यांचा सुद्धा कर्जमाफीमध्ये समावेश.  






Web Title: 82 percent farmers get direct benefit of loan waiver scheme

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.