नगरपालिकेसाठी ८३८ उमेदवारांचे अर्ज

By admin | Published: October 31, 2016 03:15 AM2016-10-31T03:15:20+5:302016-10-31T03:15:20+5:30

रायगड जिल्ह्यात होऊ घातलेल्या ९ नगरपालिकेच्या निवडणुकीत १७० जागांसाठी ८३८ उमेदवारांनी आपापले उमेदवारी अर्ज दाखल केले.

838 nominations for municipal corporation | नगरपालिकेसाठी ८३८ उमेदवारांचे अर्ज

नगरपालिकेसाठी ८३८ उमेदवारांचे अर्ज

Next


अलिबाग : रायगड जिल्ह्यात होऊ घातलेल्या ९ नगरपालिकेच्या निवडणुकीत १७० जागांसाठी ८३८ उमेदवारांनी आपापले उमेदवारी अर्ज दाखल केले. नगरध्यक्ष पदाची माळ गळ््यात पाडून घेण्यासाठी ६८ उमेदवारांनी अर्ज भरले आहेत. शनिवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी संबंधित कार्यालयामध्ये राजकीय पक्षांच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी एकच गर्दी केली होती.
नगर पालिकेच्या निवडणूकीत हवशे, नवशे गवश्यांनीही उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत, असले तरी २ नोव्हेंबर रोजी अर्जाची छाननी होणार आहेत, तर ११ नोव्हेंबरला अर्ज मागे घेण्याची मुदत आहे. त्यामुळे किती उमेदवार रिंगणात राहतात याचे चित्र तेव्हाच स्पष्ट होणार आहे.
पक्षांर्तंगत कुरुबुरीमुळे काहींनी स्वतंत्र अर्ज दाखल केल्याने बड्या राजकीय पक्षांना मात्र चांगलाच धक्का बसला आहे. त्याचा सर्वाधिक फटका रोहे येथे राष्ट्रवादी काँग्रेसला बसला आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आमदार सुनील तटकरे यांचे व्याही संतोष पोटफोड यांना पक्षाने उमेदवारी दिल्याने तटकरे यांचे पुतणे संदीप तटकरे यांनी नगराध्यक्ष पदासाठी अर्ज भरला आहे. संदीप हे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अवधुत तटकरे यांचे बंधु आहेत.
अलिबागमध्ये काँग्रेस, भाजपा यांच्या आघाडीने काँग्रेसचे समिर ठाकूर यांना नगराध्यक्ष पदाची उमेदवारी दिली. काँग्रेस, भाजपाच्या आघाडीतून शिवसेना बाहेर पडली आहे. त्यांनी स्वतंत्र उमेदवार उभे करतानाच नगराध्यक्ष पदासाठी अ‍ॅड. सुशिल पाटील यांना उमेदवारी दिली आहे. पेण नगराध्यक्षपदासाठी काँग्रेसच्या प्रितम पाटील यांनी अर्ज दाखल केला आहे. (प्रतिनिधी)
स्थानिक पातळीवरील राजकारणाचा फटका
भाजपा नगर विकास आघाडीतून वादग्रस्त ठरलेले संतोष शुंगारपूरे यांना उमेदवारी बहाल करण्यात आली आहे. स्थानिक पातळीवरील राजकारण वेगवेगळे असल्याने काही ठिकाणी शत्रु तर काही ठिकाणी मित्र, असे राजकीय चित्र उभे राहीले आहे.
सत्तेसाठी निर्माण झालेल्या सोयीस्कर राजकारणाला मतदार स्वीकारणार की नाकारणार हे लवकरच स्पष्ट होणार आहे. तूर्तास नगर पालिकेच्या निवडणूकीची रणधुमाळी सुरु झाली आहे. पुढील २५ दिवस ती अनुभवला मिळणार एवढे मात्र नक्की आहे.
इच्छूक आणि विद्यमान नगरसेवक असलेल्या अनेकांना काही पक्षांनी डावलेले आहे. त्यामुळे नाराज झालेल्या इच्छूकांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.
>नगराध्यक्षपदासाठी सहा उमेदवारी अर्ज
महाड : उमेदवारी अर्ज दाखल करायच्या अखेरच्या दिवशी शनिवारी महाडमध्ये नगराध्यक्षपदासाठी सहा तर नगरसेवक पदासाठी १७ जागांसाठी ७४ उमेदवारांना आपली नामनिर्देशनपत्रे निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी सुषमा सातपुते यांच्याकडे दाखल केली. यावेळी उमेदवारांनी शक्तीप्रदर्शन करून मिरवणूक काढली. नगराध्यक्षपदासाठी काँग्रेसतर्फे माजी आ. माणिक जगताप यांच्या कन्या स्रेहल जगताप, शिवसेनेतर्फे भाग्यश्री म्हामूणकर, मनसेच्या मेघा कुलकर्णी, नुपूर जोशी, शर्मिला सावंत यांचे अर्ज दाखल झाले. सध्या नगरपरिषदेत निर्विवाद वर्चस्व असलेल्या काँग्रेसने यावेळी शक्तीप्रदर्शन केले. शिवसेना, भाजपा, मनसे, शेकाप, राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षांची एकत्रित काँग्रेसच्या विरोधात महाआघाडी झाली होती. मात्र जागा वाटपाची घोळात राष्ट्रवादी काँग्रेस, मनसे हे दोन पक्ष महाआघाडीतून बाहेर पडले आहेत. मनसे व राष्ट्रवादीने नगराध्यक्षासह काही जागांवर अर्ज केले.शेतकरी कामगार पक्षाचे कुमार मेहता यांनाही उमेदवारी शिवसेनेने नाकारल्यामुळे शेतकरी कामगार पक्षाच्या भूमिकेकडे लक्ष लागले आहे. शेकापच्या वरिष्ठ नेत्यांनी मात्र शिवसेनेबरोबर न जाण्याच्या सूचना स्थानिक नेते कुमार मेहता यांना दिल्या होत्या. जिल्ह्यात इच्छूकांना उमेदवारी न मिळाल्याने अनेकांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला आहे.

Web Title: 838 nominations for municipal corporation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.