एकतर्फी बदलीतील ८५ शिक्षकांची धाकधूक!
By Admin | Published: March 3, 2017 01:21 AM2017-03-03T01:21:56+5:302017-03-03T01:21:56+5:30
कारवाईबाबत प्रशासनाचा कायमचा गोंधळ
अकोला, दि.२ : जिल्हा परिषदेत शिक्षकांच्या भरतीसोबतच आंतरजिल्हा बदलीचाही मोठा घोटाळा झालेला आहे. त्यातही एकतर्फी बदलीने रुजू झालेल्यांची संख्याही प्रचंड आहे. त्यामुळे ८५ शिक्षक अतिरिक्त ठरलेले आहेत. त्यांच्यावर कोणती कारवाई करावी, या मुद्यांवर शिक्षण विभागाचा गेल्या अनेक महिन्यांपासून गोंधळ आहे. त्या शिक्षकांची मात्र, धाकधूक सुरूच आहे.
जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागात अनेक चमत्कारांचा कळस झालेला आहे. त्यामुळे या विभागात काम करणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांसोबत अनेकांची धाकधूक सुरू असते.
त्या विभागात रुजू होण्यास काही ‘निष्णात’ कर्मचारी वगळता कुणीही तयार नाही.
या परिस्थितीत एकतर्फी आंतरजिल्हा बदलीने आलेल्या ८५ कर्मचाऱ्यांवर कारवाईचा कोणता पर्याय वापरला जातो, यावरच त्यांचे नोकरीतील ठिकाण ठरणार आहे. जिल्हा परिषदेत एकतर्फी बदलीने रुजू झालेल्या शिक्षकांमध्ये सर्वच प्रवर्गातील शिक्षकांचा समावेश आहे.
एकतर्फी बदलीने आलेले शिक्षक
प्रतिभा पुंडे, छाया खानंदे, प्रकाश अंभोरे, पार्वती सनगाळे, सुुरेखा बिजवे, गजानन खेडेकर, अभय पजई, श्याम मानकर, सुभाष जाधव, राहुल तिडके, महेश माहुलकर, मिलिंद अडगोकर, किशोर मेश्राम, अतुल पाथरकर, श्याम तांबडे, विजया गावंडे, प्रशांत सरोदे, रुपाली देशमुख, रुपेश राठोड, अविनाश कडू, छाया राऊत, देवीदास साळुंके, ज्योती गाडगे, विजयसिंग चव्हाण, सारिका राखोंडे, अर्चना पोहरकर, स्वप्नाली पाटील, रेणुका बाबर, अमित चव्हाण, राजू ठाकरे, गजानन लोखंडे, सुभाष खुळे, दिनेश ठाकरे, गजानन करवते, रघुनाथ पांडे, शुभांगी वाघमारे, नितीन श्रीनाथ, संजय पवार, जया वाघोळे, वर्षा गोपनारायण, प्रशांत इंगळे, राजेश इंगळे, नितीन उकर्डे, मंदा चव्हाण, चंदा पवार, मनीषा सर्वज्ञ, राजेश तायडे, अर्चना खाडे, अश्विनी बोंडे, सीमा सरोदे, आर.डी. ढोले, संतोष लोेणे, विजया राऊत, अनंत नाहाटे, अजय मावदे, मनोज दुधे, प्रदीप मंगळे, आशा मालवे, रुपाली साबळे, विठ्ठल वानखडे, वासुदेव चिपडे, संजय एकीरे, जयश्री राऊत, सरोज दातीर, सीमा हिरोळे, राजेश मुकुंदे, प्रदीप नवलकार, मनीषा वानखडे, सीमा राऊत, पांडुरंग डाबेराव, उज्ज्वला अढाव, दीपाली वानखडे, गजानन कराळे, अनंतकुमार तायडे, ओमप्रकाश उगले, राजेंद्र दिवनाले, प्रदीप जाधव, नितीन भागवत, दिनेश महल्ले, देवेंद्र फोकमारे, विद्या मढे, दीपाली भुईकर, किरण पाटील, धर्मेद्रसिंग चव्हाण, विजया खंडारे.
कारवाईचे स्वरूप लवकरच ठरणार!
एकतर्फी आंतरजिल्हा बदलीने आलेले शिक्षक बिंदू नामावली मंजूर नसताना रुजू झाले आहेत. आधीच शिक्षक अतिरिक्त असतानाही त्यांना रुजू करून घेण्यात आले आहे. चुकीच्या पद्धतीने ही प्रक्रिया राबवण्यात आली. त्या सर्व प्रकरणात तत्कालिन वरिष्ठ अधिकारी-कर्मचारीही दोषी आहेत. त्यामुळे त्या सर्वांवरही कारवाई झाल्यासच या प्रकरणाची तड लागणार आहे.