राज्यात सरासरीच्या ८६ टक्के पाऊस; जलाशयांमध्ये मात्र ६६ टक्केच साठा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 5, 2018 12:18 AM2018-09-05T00:18:20+5:302018-09-05T00:18:33+5:30

राज्याच्या सर्व भागात पाऊस पोहोचला असून १ जून ते ४ सप्टेंबर या कालावधीत सरासरी ८२३ मि.मी. म्हणजेच पाऊस झाला असून जलाशयांमध्ये ६६.१ टक्के साठा निर्माण झाला आहे. खरीप हंगामात ९७ टक्के क्षेत्रावर पेरणी पूर्ण झाली.

86% rain in the state; Only 66% of reservoirs in reservoirs | राज्यात सरासरीच्या ८६ टक्के पाऊस; जलाशयांमध्ये मात्र ६६ टक्केच साठा

राज्यात सरासरीच्या ८६ टक्के पाऊस; जलाशयांमध्ये मात्र ६६ टक्केच साठा

Next

मुंबई : राज्याच्या सर्व भागात पाऊस पोहोचला असून १ जून ते ४ सप्टेंबर या कालावधीत सरासरी ८२३ मि.मी. म्हणजेच पाऊस झाला असून जलाशयांमध्ये ६६.१ टक्के साठा निर्माण झाला आहे. खरीप हंगामात ९७ टक्के क्षेत्रावर पेरणी पूर्ण झाली.
११ जिल्ह्यांत १०० टक्क्यांपेक्षा अधिक पाऊस झाला आहे. गेल्या वर्षी याच सुमारास ७८.३ टक्के पाऊस झाला होता. सरासरीच्या १०० टक्क्यांहून अधिक पाऊस झालेल्या जिल्ह्यांमध्ये ठाणे, रत्नागिरी, पालघर, पुणे, सातारा, सांगली, नांदेड, हिंगोली, अकोला, वाशिम आणि गडचिरोली या जिल्ह्यांचा समावेश आहे.
रायगड, सिंधुदुर्ग, धुळे, अहमदनगर, कोल्हापूर, जालना, लातूर, परभणी, बुलडाणा, अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया आणि चंद्रपूर या १६ जिल्ह्यांमध्ये ७५ ते १०० टक्के पाऊस झाला. तर, सर्वाधिक जलसाठा कोकण विभागात ९३.०७ टक्के उपलब्ध आहे.

मुंबईकरांना पाण्याचे ‘नो टेंशन’
मुंबईत श्रावण सरी बरसल्यानंतर विश्रांती घेणाऱ्या पावसाने तलाव परिसरातील हजेरी कायम ठेवली आहे. त्यामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाºया तलावांमध्ये ९६ टक्के जलसाठा जमा झाला आहे. परिणामी, मुंबईकरांना पाण्यासाठी पुढील वर्षभर वणवण करावी लागणार नाही.
१ आॅक्टोबर रोजी तलावांमध्ये किती जलसाठा आहे, यावर वर्षभराच्या पाणीपुरवठ्याचे गणित अवलंबून असते. आजच्या तारखेला तलाव क्षेत्रात १३ लाख ९३ हजार ८२६ दशलक्ष लीटर जलसाठा जमा झाला आहे. हा जलसाठा मुंबईकरांना पुढील ३६६ दिवस पुरेल इतका आहे. पावसाचा हा शेवटचा महिना असल्याने तलावातील जलसाठा आणखी वाढणे अपेक्षित आहे.

Web Title: 86% rain in the state; Only 66% of reservoirs in reservoirs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Rainपाऊस