राज्यातील ८६ साखर कारखाने बंद
By admin | Published: January 31, 2017 12:46 AM2017-01-31T00:46:57+5:302017-01-31T00:46:57+5:30
राज्यातील ८६ साखर कारखान्यांची धुराडी बंद झाली असून, त्यात पुणे विभागातील ३१ कारखान्यांचा समावेश आहे. आत्तापर्यंत १५० कारखान्यांमधून ३२९.५४ लाख टन
पुणे : राज्यातील ८६ साखर कारखान्यांची धुराडी बंद झाली असून, त्यात पुणे विभागातील ३१ कारखान्यांचा समावेश आहे. आत्तापर्यंत १५० कारखान्यांमधून ३२९.५४ लाख टन गाळपातून ३६१.६७ लाख क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे.
राज्यात यंदा ८८ सहकारी व ६२ खासगी साखर कारखाने सुरू होते. कोल्हापुर विभागातील विभागातील ११ कारखान्यांची धुराडी बंद झाली आहेत. पुणे विभागातील ५२ कारखान्यांमधून १२४ लाख टन ऊस गाळपातून १३४ लाख क्विंटल साखरेचे उत्पादन झाले असून, १०.८१ टक्के साखर उतारा मिळाला.
नगरमधील २३ कारखान्यांमधून ३८.३७ लाख टन ऊस गाळपातून ३७.३० लाख क्विंटल साखरेचे उत्पादन झाले. येथील साखरेचा सरासरी उतारा ९.७२ टक्के आहे. या विभागातील १९ कारखान्यांची धुराडी बंद झाली आहेत. औरंगाबाद येथील १७ कारखान्यांतून २१.४६ लाख टन ऊस गाळपातून १९.१४ लाख क्विंटल साखर उत्पादित झाली आहे. साखर उतारा ८.९२ टक्के असून, १३ कारखानांचा हंगाम उरकला आहे. नांदेडमधील ११ कारखान्यांतून १०.५८ लाख टन ऊस गाळपातून १०.४२ लाख क्विंटल, तर अमरावतीतील ३ कारखान्यांमधून २.४३ लाख टन ऊस गाळपातून २.३७ लाख क्विंटल साखर उत्पादित झाली.
नांदेडमधील ९, तर अमरावतीतील तिनही कारखाने बंद आहेत. नागपूरच्या ४ कारखान्यांमधून ३.६३ लाख टन ऊस गाळपातून ३६१.६७ लाख क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे. येथील साखर उतारा १०.९७ टक्के मिळाला (प्रतिनिधी)
६२ कारखानेच सुरू
राज्यात यंदा ८८ सहकारी व ६२ खासगी साखर कारखाने सुरू होते. कोल्हापुर विभागातील ४० सहकारी व खासगी साखर कारखान्यांमधून १२९ लाख टन ऊस गाळपातून १५४.७९ लाख क्विंटल साखरेचे उत्पादन झाले.