८६३ अनधिकृत नळजोडण्या खंडित
By admin | Published: May 17, 2016 04:00 AM2016-05-17T04:00:37+5:302016-05-17T04:00:37+5:30
नवी मुंबईकरांनाही यंदा पाणीटंचाईच्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे.
नवी मुंबई : मागील वर्षी झालेल्या अपुऱ्या पावसामुळे स्वत:च्या मालकीचे मोरबे धरण असूनही नवी मुंबईकरांनाही यंदा पाणीटंचाईच्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे. संपूर्ण राज्याला दुष्काळाची झळ सोसावी लागत आहे. ९ ते १३ मेच्या दरम्यान महापालिका क्षेत्रात झालेल्या कारवाईनुसार ८४३ नळजोडण्यांवर धडक कारवाई करण्यात आली आहे.
बेलापूर विभागात ५८, नेरु ळ विभागात ८१, वाशी विभागात ८६, तुर्भे / सानपाडा विभागात १४१, कोपरखैरणे विभागात ५७, घणसोली विभागात ३७, ऐरोली विभागात १८० तसेच दिघा विभागात २२३ ठिकाणी कारवाई करण्यात आली. पाणीटंचाई लक्षात घेता महानगरपालिका पाणीपुरवठा विभागाच्यावतीने जलबचतीच्या दृष्टीने व्यापक स्वरूपात जनजागृती करण्यात येत आहे, तसेच विविध उपाययोजना करण्यात येत आहेत.