सहा महिन्यांत ८६५ लाचखोर गजाआड

By admin | Published: July 2, 2015 03:45 AM2015-07-02T03:45:58+5:302015-07-02T03:45:58+5:30

लाचखोर अधिकाऱ्यांना आळा बसावा यासाठी यावर्षी राज्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने(एसीबी) अधिक कडक कारवाई करत अवघ्या सहा महिन्यात तब्बल ८६५ जणांना अटक केली.

865 bribery casualties in six months | सहा महिन्यांत ८६५ लाचखोर गजाआड

सहा महिन्यांत ८६५ लाचखोर गजाआड

Next

मुंबई : लाचखोर अधिकाऱ्यांना आळा बसावा यासाठी यावर्षी राज्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने(एसीबी) अधिक कडक कारवाई करत अवघ्या सहा महिन्यात तब्बल ८६५ जणांना अटक केली. अटक आरोपींमध्ये महसूल विभाग आणि गृहविभागातील अधिकारी सर्वाधिक आहेत, तर शासकीय आस्थापनांमधील तिसऱ्या श्रेणीत काम करणारे अधिकारी-कर्मचारी सर्वात लाचखोर आहेत, हे स्पष्ट झाले.
गेल्या वर्षी एसीबीने संपूर्ण राज्यात १२४५ कारवाया केल्या होत्या. जानेवारी ते जूनपर्यंत करण्यात आलेल्या कारवायांमध्ये ३७ जणांवर गुन्हा सिद्ध झाला होता. या वर्षी एसीबीने राज्यात ६१२ सापळे रचले. यामध्ये एकून ८६५ जणांवर कारवाई करण्यात आली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा ४६ सापळे जास्त आहेत. यंदा पहिल्या सहा महिन्यांमध्ये तब्बल ६१ खटल्यांमध्ये लाचखोर अधिकाऱ्यांना शिक्षा झाली. अद्यापही राज्याच्या विविध न्यायालयांमध्ये ३५८७ खटले सुरू आहेत.
या आरोपींकडून १ कोटी ४२ लाख २७ हजार ४६३ इतकी मालमत्ता हस्तगत केली आहे, तर बेहिशोबी मालमत्तेपकरणी ९ कोटी ७६ लाख ५१ हजार ३९५ इतकी रक्कम हस्तगत केली आहे. लाच घेताना अटक झालेल्यांमध्ये ग्रामविकास विभाग १११, नगर विकास विभाग ४२, म.रा.वि.वि.क. मर्या ३५, आरोग्य विभाग २३, शिक्षण विभाग ३०, वन विभाग २२, सहकार आणि पणन विभाग ११ आणि पाटबंधारे विभाग ७ या अधिकाऱ्यांचा समावेश आहे.

आरोपी : १५५ पोलीस, ८२ तलाठी, ३० इंजिनिअर, २२ शिक्षक, ११ डॉक्टर, ४ वकील, ५ सरपंच, २ नगरसेवक/महापौर असे लोकसेवक, तर कारवाई झालेल्या खासगी व्यक्तींची संख्या १३३ आहे. लाचखोर लोकसेवकांमध्ये ५० महिलांचा सहभाग आहे.

Web Title: 865 bribery casualties in six months

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.