लातूर जिल्ह्याचा ८६.५३ टक्के निकाल

By admin | Published: June 6, 2016 11:59 PM2016-06-06T23:59:22+5:302016-06-07T07:23:57+5:30

लातूर : लातूर जिल्ह्यातून ४० हजार ७२९ विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ट झाले़ पैकी ३५ हजार २४२ उत्तीर्ण झाले़ लातूर जिल्ह्याने ८६़५३ टक्के मिळवीत मंडळात अव्वल क्रमांक पटकाविला आहे़

86.53 percent result in Latur district | लातूर जिल्ह्याचा ८६.५३ टक्के निकाल

लातूर जिल्ह्याचा ८६.५३ टक्के निकाल

Next

लातूर : लातूर जिल्ह्यातून ४० हजार ७२९ विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ट झाले़ पैकी ३५ हजार २४२ उत्तीर्ण झाले़ लातूर जिल्ह्याने ८६़५३ टक्के मिळवीत मंडळात अव्वल क्रमांक पटकाविला आहे़ विशेष म्हणजे यंदाही मुलांपेक्षा मुलींच्या उत्तीर्णतेचे प्रमाण अधिक आहे. जिल्ह्यातून १७ हजार २३४ मलींनी परीक्षा दिली. त्यापैकी १५ हजार ३३७ मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. हे प्रमाण मुलांच्या तुलनेत ४.२७ टक्क्यांनी अधिक आहे.
जिल्ह्यातून २३ हजार ४९५ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यापैकी १९ हजार ९०५ विद्यार्थी पास झाले आहेत. मुलांच्या उत्तीर्णतेचे प्रमाण ८४.७२ टक्के असून, मुलींच्या उत्तीर्णतेचे प्रमाण ८८.९९ आहे.
बेस्ट फाईव्ह अन् स्पोर्टस्ने वाढली टक्केवारी
सहा अनिवार्य विषय घेऊन परीक्षेस सामोरे जाऊन उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची टक्केवारी फुगली आहे. ज्या पाच विषयांचे गुण अधिक आहेत, त्या पाच विषयांचेच एकूण गुण ग्राह्य धरून ५०० पैकी टक्केवारी काढण्यात आली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकेवरील टक्केवारीचा आलेख उंचावला आहे. त्यात स्पोर्टस्च्या गुणांचीही भर पडल्यामुळे तो पैकीच्या पैकींवर गेला आहे.
संस्कृत, विज्ञान, गणित, सामाजिक शास्त्र आदी विषय गुणांकन वाढविणारे आहेत. बहुतांश विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकेवर या विषयाचे गुण अन्य विषयांच्या तुलनेत सर्वाधिक आहेत. याच विषयात बहुतांश विद्यार्थ्यांना ‘बेस्ट आॅफ फाईव्ह’ म्हणून गुण मिळाले आहेत. शिवाय, २०१५-१६ या शैक्षणिक वर्षापासून खेळाडू विद्यार्थ्यांना उत्तीर्ण होण्यासाठी तसेच उत्तीर्ण विद्यार्थ्यांना १०० टक्के गुणांच्या आधीन राहून शासनाच्या निर्णयानुसार खेळाचे गुण देण्यात आले आहेत. १५, २० आणि २५ अशा तीन पद्धतीने गुण विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकावर दिसत आहेत. १०० पैकी १०० टक्के मिळण्यासाठी जेवढे गुण कमी आहेत, तेवढे गुण स्पोर्टस् कोट्यातून मिळाले आहेत.
४३० विद्यार्थ्यांना स्पोर्टस् सवलतीतून गुण...
लातूर विभागातील लातूर जिल्ह्यातून ४३० विद्यार्थ्यांनी स्पोर्टस् सवलतीचा फायदा उचलला आहे. ३९९ विद्यार्थी शालेय स्पर्धेत सहभाग घेऊन स्पोर्टस् गुणांसाठी पात्र झाले आहेत. तर ३१ विद्यार्थी संघटनेमार्फत आयोजित स्पर्धेत सहभाग नोंदवून हे गुण मिळविले आहेत. त्यांच्या बेस्ट फाईव्हची आणि स्पोर्टस्ची बेरीज एकत्र झाल्याने यातील बहुतांश विद्यार्थ्यांचे १०० पैकी १०० गुण आले आहेत.

Web Title: 86.53 percent result in Latur district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.