सौर कृषिपंपाच्या वीजजोडणीसाठी ८,६८५ शेतकऱ्यांचे अर्ज
By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2019 06:09 AM2019-01-31T06:09:49+5:302019-01-31T06:10:05+5:30
२०१९ अखेरपर्यंत ५० हजार शेतकऱ्यांना वीजजोडणी देण्याचे महावितरणचे उद्दिष्ट
मुंबई : मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजनेत मार्च, २०१९ अखेरपर्यंत ५० हजार शेतकऱ्यांना वीजजोडणी देण्याचे महावितरणचे उद्दिष्ट आहे. या संदर्भात महावितरणने पोर्टल सुरू केल्यानंतर दहा दिवसांत सौर कृषिपंपाच्या वीजजोडणीसाठी ८ हजार ६८५ शेतकºयांनी अर्ज केले.
सौर कृषिपंप योजनेच्या अंमलबजावणीसाठी महावितरणने योजनेच्या संदर्भात शेतकºयांकडून विचारण्यात येणारे प्रश्न, त्यांच्या उत्तरांसाठी मार्गदर्शन पुस्तिका तयार केली आहे. पुस्तिकेचे वितरण करण्यात येत आहे. योजनेची माहिती शेतकºयांना व्हावी, यासाठी व्हॉट्सअॅपचा वापर करण्यात येत आहे. क्षेत्रीय स्तरावरील मुख्य अभियंता, अधीक्षक अभियंता व कार्यकारी अभियंता सोशल माध्यमांद्वारे शेतकºयांसोबत संवाद साधत आहेत.
शेतकºयांना कृषिपंपाकरिता वीजजोडणी घेण्यासाठी महावितरणच्या वेबसाइटवर स्वतंत्र पोर्टल उपलब्ध करून देण्यात आले आहे. २९ जानेवारी, २०१९ पर्यंत सुमारे ८ हजार ६८५ शेतकºयांंनी अर्ज केले असून, मराठवाड्यातील शेतकºयांकडून योजनेला उत्तम प्रतिसाद मिळत आहे. गेल्या दहा दिवसांत ५ हजार ४४६ शेतकºयांनी या पोर्टलवरून अर्ज भरले, अशी माहिती महावितरणने दिली आहे.