राज्यात नवे ८७ कोरोनाबाधित; दोन रुग्णांचा मृत्यू, तर मुंबईत १९ नवीन रुग्ण
By संतोष आंधळे | Published: December 27, 2023 09:15 PM2023-12-27T21:15:30+5:302023-12-27T21:16:44+5:30
१४ जण बरे होऊन घरी गेले असल्याची राज्याच्या आरोग्य विभागाची माहिती
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: राज्यात काही दिवसांपासून कोरोनाचे नवीन रुग्ण सापडण्यास सुरुवात झाली आहे. त्यामध्ये बुधवारी राज्यात एकूण ८७ नवीन रुग्णांनाची नोंद करण्यात आली आहे. यात १९ रुग्ण हे मुंबई शहरातील आहेत. दोन कोरोनाबाधितांचा आज मृत्यू झाला आहे, त्यामध्ये प्रत्येकी एक पुणे महानगरपालिका आणि सांगली जिल्ह्यातील रुग्णाचा समावेश आहे. राज्यात २६५ आणि मुंबईत १०३ कोरोनाचे सक्रिय रुग्ण आहेत. आज १४ जण बरे होऊन घरी गेले असल्याची माहिती राज्याच्या आरोग्य विभागाने दिली आहे.
मुंबईत जे १९ रुग्ण सापडले आहेत, त्यापैकी कुणालाही आज रुग्णालयात दाखल करण्याची गरज भासली नाही. शहरात सध्याच्या घडीला कोरोनाकरिता राखीव असणाऱ्या ४,२१५ बेड्सपैकी ८ बेड्सवर रुग्ण दाखल आहेत. चार रुग्ण बरे होऊन घरी गेले. दिवसभरात कोरोनाच्या ३३१ चाचण्या करण्यात आल्या. जे.एन. १ चे १० रुग्ण या व्हेरियंटचा एकही रुग्ण आढळून आलेला नाही.
नव्याने नोंद झालेले महामुंबईतील रुग्ण
- मुंबई मनपा - १९
- ठाणे मनपा - ६
- कल्याण-डोंबिवली मनपा - २
- नवी मुंबई - ६
- रायगड - १