दावोसमध्ये दोन दिवसांतच महाराष्ट्रासाठी ८८ हजार कोटींचे गुंतवणूक करार

By ऑनलाइन लोकमत | Published: January 18, 2023 07:57 AM2023-01-18T07:57:41+5:302023-01-18T07:59:38+5:30

राज्यातील ३० हजार तरुणांच्या हाताला मिळणार काम

88 thousand crores investment deal for Maharashtra in two days in Davos | दावोसमध्ये दोन दिवसांतच महाराष्ट्रासाठी ८८ हजार कोटींचे गुंतवणूक करार

दावोसमध्ये दोन दिवसांतच महाराष्ट्रासाठी ८८ हजार कोटींचे गुंतवणूक करार

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

दावोस: स्वित्झर्लंड येथील दावोस येथे सुरू झालेल्या जागतिक आर्थिक परिषदेत दोन दिवसांत महाराष्ट्रात सुमारे ८८ हजार ४२० कोटींचे गुंतवणूक करार करण्यात आले. या परिषदेसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्योगमंत्री उदय सामंत हे दावोसमध्ये दाखल झाले आहेत. दावोस येथे असलेल्या महाराष्ट्र पॅव्हेलियनचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन झाले.

येथे महत्त्वाच्या उद्योगांसमवेत येथे सामंजस्य करारही केले जात आहेत. या माध्यमातून ३० हजारांहून अधिक तरुणांच्या हाताला काम मिळणार असल्याची माहिती उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिली आहे. हे करार झाले त्यावेळी मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव भूषण गगराणी, उद्योग प्रधान सचिव डॉ. हर्षदीप कांबळे, एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विपीन शर्मा आदी उपस्थित होते.

झालेले करार-

  • पुणे येथे २५० कोटी रुपये खर्चाचा रूखी फूडसचा ग्रीनफिल्ड अन्न प्रक्रिया प्रकल्प. 
  • औरंगाबाद येथे १२ हजार कोटी रुपये गुंतवणुकीचा ग्रीनको नविनीकरण ऊर्जेचा (रिन्युएबल एनर्जी) प्रकल्प, ६,३०० जणांना रोजगार मिळेल.
  • बर्कशायर-हाथवेबरोबर १६ हजार कोटींचा गुंतवणूक करार. नागरी विकासाला चालना मिळेल.
  • पुण्याजवळ जपानच्या निप्रो कार्पोरेशनचा १,६५० कोटी रुपये गुंतवणुकीचा ग्लास ट्यूबिंग प्रकल्प. यामुळे महाराष्ट्रातील औषध निर्मिती क्षेत्राला चालना मिळणार असून, यातून २ हजार रोजगार निर्मिती होईल.
  • मुंबई येथे इंडस् कॅपिटल पार्टनर्स यांचा १६ हजार कोटींच्या गुंतवणुकीचा प्रकल्प येणार असून, आरोग्य, तंत्रज्ञान, संरक्षण अशा विविध क्षेत्रांमध्ये उत्कृष्ट दर्जाच्या सेवा देता येऊ शकतील.
  • बर्कले येथील कॅलिफोर्निया विद्यापीठाबरोबर मुंबई महानगरात स्मार्ट व्हिलेज उभारणीस करार.
  • अमेरिकेच्या न्यू एरा क्लिनटेक सोल्युशनचा चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती येथे २० हजार कोटींचा कोल गॅसीफिकेशन प्रकल्प 
  • ब्रिटनच्या वरद फेरो ॲलाँईजचा गडचिरोलीतील चार्मोशी येथे १,५२० कोटींचा स्टील प्रकल्प 
  • इस्रायलच्या राजुरी स्टील्स ॲण्ड अलॉईजचा चंद्रपूरमधील मूल येथे ६०० कोटींचा स्टील प्रकल्प
  • पोर्तुगालच्या एलाईट प्लास्ट ॲटो सिस्टीम्सचा पिंपरी येथे ४०० कोटींचा प्लास्टिक ॲटोमोटीव्हज् प्रकल्प तसेच गोगोरो इंजिनिअरिंग व बडवे इंजिनिअरिंगचा २० हजार कोटींचा ऑटो प्रकल्प.

Web Title: 88 thousand crores investment deal for Maharashtra in two days in Davos

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.